Home मनोरंजन Jubilee Star Rajendrakumar : चला चला जाऊ सिनेमाला : ज्यूबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या रुपेरी कारकीर्दीचा सुवर्ण आढावा

Jubilee Star Rajendrakumar : चला चला जाऊ सिनेमाला : ज्यूबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या रुपेरी कारकीर्दीचा सुवर्ण आढावा

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्यूबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा, अजरामर गीतांचा आणि यशस्वी कारकिर्दीचा भावस्पर्शी आढावा. दिल एक मंदिर ते मेरे महबूबपर्यंतचा सुवर्ण प्रवास.

by Admin
Spread the love

(सुरेश कंक )हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते आले, अनेकांनी लोकप्रियतेची शिखरे गाठली; मात्र प्रत्येक चित्रपट यशस्वी होण्याचा विक्रम फार थोड्यांच्या वाट्याला आला. अशाच दुर्मिळ कलाकारांपैकी एक म्हणजे राजेंद्रकुमार. त्यांनी ज्या चित्रपटांत काम केले, त्यांपैकी बहुसंख्य चित्रपटांनी रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी यश संपादन केले. त्यामुळेच त्यांच्या नावापुढे “ज्यूबिली स्टार” ही उपाधी कायमची जोडली (Jubilee Star Rajendrakumar )गेली.

साइड प्रोफाइलमधून पाहिल्यास दिलीपकुमार यांची आठवण करून देणारे राजेंद्रकुमार हे १९६० च्या दशकातील तरुण-तरुणींच्या मनातील स्वप्नातील राजकुमार होते. त्यांच्या अभिनयातील सहजता, निरागसता आणि भावनांची खोली प्रेक्षकांच्या मनाला थेट स्पर्श करून (Jubilee Star Rajendrakumar )जायची.

दुःख, विरह, प्रेमभंग किंवा अंतर्मनातील वेदना पडद्यावर साकारायच्या असतील, तर राजेंद्रकुमार यांच्यासारखा अभिनेता दुर्मिळ होता. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावना आणि डोळ्यांतून व्यक्त होणारे दुःख प्रेक्षकांच्या काळजाला भिडत (Jubilee Star Rajendrakumar )असे.

राजेंद्रकुमार आणि महान गायक मोहम्मद रफी यांची जोडी विशेष गाजली. रफी यांच्या आवाजातून राजेंद्रकुमार यांची भावविश्वे अधिक जिवंत होत (Jubilee Star Rajendrakumar )गेली.

“हमने जफा न सीखी, उनको वफा ना आयी…”
(जिंदगी)

प्रेमभंगाची वेदना व्यक्त करताना ते म्हणतात –

“कह दो कोई ना करे यहाँ प्यार, इसमें खुशियाँ हैं कम, बेशुमार हैं गम…”
(गुंज उठी शहनाई)

तर विरहाने व्याकूळ झालेला प्रेमी गातो –

“याद में तेरी जाग-जाग के हम, रातभर करवटे बदलते रहे…”
(मेरे महबूब)

एल. व्ही. प्रसाद यांच्या “हमराही” चित्रपटातील “ये आँसू मेरे दिल की जुबान हैं” हे गीत आजही प्रेम आणि विरहाच्या भावना तितक्याच प्रभावीपणे व्यक्त (Jubilee Star Rajendrakumar )करते.

दिल एक मंदिर” : भावनांचा शिखरबिंदू

राजेंद्रकुमार यांच्या अभिनयाची खरी ताकद अनुभवायची असेल, तर “दिल एक मंदिर” हा चित्रपट पाहायलाच हवा. चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षक बराच वेळ अस्वस्थ राहतो, इतका तो मनावर प्रभाव टाकतो.

या चित्रपटात राजकुमार, मीनाकुमारी आणि राजेंद्रकुमार या तिघांनीही आपल्या भूमिकांना अक्षरशः जीव ओतला (Jubilee Star Rajendrakumar )आहे.

कथानक प्रेमाच्या त्रिकोणाभोवती फिरते. मीनाकुमारीचे प्रेम राजेंद्रकुमार यांच्यावर असते; परंतु तिचे लग्न राजकुमार यांच्याशी होते. पुढे राजकुमार यांना कर्करोग होतो आणि उपचारासाठी ते ज्या रुग्णालयात दाखल होतात, तेथील प्रमुख डॉक्टर असतात राजेंद्रकुमार. स्वतःच्या भूतकाळातील प्रेमाच्या आठवणी मनात दडवून ते आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या पतीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा (Jubilee Star Rajendrakumar )करतात.

चित्रपटातील एक प्रसंग विशेष लक्षात राहतो. अनेक वर्षांनंतर आपली प्रेयसी समोर उभी राहते. त्यानंतर एकांतात बसून तो जुन्या आठवणींना उजाळा देत गातो –

“याद न जाए बीते दिनों की…”

शंकर-जयकिशन यांचे संगीत, शैलेंद्र यांचे शब्द आणि मोहम्मद रफी यांचा स्वर यामुळे हे गीत अजरामर झाले आहे. आजही हे गीत ऐकताना मन नकळत भूतकाळात हरवून(Jubilee Star Rajendrakumar ) जाते.

प्रेमाच्या रंगछटाही तितक्याच मोहक

राजेंद्रकुमार फक्त दुःख आणि वेदनांचे बादशाह नव्हते. प्रेमातील चंचलता, खट्याळपणा आणि रोमँटिक अंदाजही ते तितक्याच प्रभावीपणे साकारत.

“तेरी प्यारी प्यारी सूरत को, किसी की नजर ना लगे…”
(ससुराल)

“पहले मिले थे सपनों में और आज सामने पाया…”
(जिंदगी)

“ये हुस्न जरा जाग, तुझे इश्क जगाए…”
(मेरे महबूब)

“मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम…”

या गीतांमधून त्यांचा प्रेमवीर नायक प्रेक्षकांच्या मनात घर करून (Jubilee Star Rajendrakumar )गेला.

चित्रपटांच्या नावांतून उलगडलेले राजेंद्रकुमार

राजेंद्रकुमार यांच्या कारकीर्दीचा प्रवास हा त्यांच्या चित्रपटांच्या नावांतूनही सुंदरपणे मांडता येईल.

पूर्व दिशेला “सूरज” उगवतो आणि “झुक गया आसमान” होते. **“साथी”**च्या शोधात तो “तलाश” करत “अंजाना” आणि “गवार” बनून फिरतो. मनात “आरजू” घेऊन **“धरती”**वर **“शतरंज”**च्या चाली (Jubilee Star Rajendrakumar )खेळतो.

आपले “वचन” पाळत **“कानून”**चा सन्मान करतो. “आस का पंछी” बनून **“मेरे महबूब”**च्या शोधात **“ससुराल”**पर्यंत पोहोचतो. “दिल एक मंदिर” पाहून त्याला “घराना” आठवते आणि **“आई मिलन की बेला”**ची चाहूल लागते. “गोरा और काला” या भेदापलीकडे जाऊन तो **“अमन”**ची भाषा(Jubilee Star Rajendrakumar ) बोलतो.

हातात “धूल का फूल” घेऊन तो प्रेमाचा संदेश देतो आणि तेव्हाच दूरवरून **“गुंज उठी शहनाई”**चा स्वर ऐकू येतो. त्याच्या ओठांवर आपसूकच शब्द उमटतात –

“आप आये बहार आयी…”

आणि समोर उभी असते हिंदी चित्रपटसृष्टीचीच “मदर इंडिया”.

राजेंद्रकुमार यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय, त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी यांच्याबद्दल लिहिणे, वाचणे आणि ऐकणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय “संगम” अनुभवणे होय. म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीतील हा ज्यूबिली स्टार आजही रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमाने आणि आदराने जिवंत (Jubilee Star Rajendrakumar )आहे.

– सुरेश कंक
क्रमशः…

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00