Home गुन्हे Administrative Action:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेची कारवाई; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचा कार्यभार काढला

Administrative Action:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेची कारवाई; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचा कार्यभार काढला

मोशी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटनेनंतर पीसीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मोठी कारवाई. संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचा कार्यभार काढून अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश काढून मुख्य अभियंता-१ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाशी संबंधित सर्व कामकाज काढून इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला (Administrative Action) आहे.

 

आदेशानुसार, मुख्य अभियंता-२ प्रमोद ओंबासे यांच्याकडे पर्यावरण अभियांत्रिकीसह जलनिःसारण मुख्य कार्यालय, झोनिपू स्थापत्य, बीएसयूपी (BSUP) आणि पीएमएवाय (PMAY) विभागांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच कार्यकारी अभियंता सोहन निकम यांच्याकडे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविण्यात आले(Administrative Action) आहे.

 

मोशी दुर्घटनेनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यावरण विभागाचा कार्यभार बदलण्याचा निर्णय घेतल्याने ही दुर्घटनेनंतरची पहिली महत्त्वाची प्रशासकीय कारवाई मानली जात (Administrative Action)आहे.

 

मात्र, केवळ कार्यभार काढून घेणे पुरेसे ठरणार की संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन अथवा शिस्तभंगाची कारवाईही होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले(Administrative Action) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00