Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Ganesh Visarajan :अनंत चतुर्दशीसाठी महापालिका सज्ज; ४१ कृत्रिम तलावांची व्यवस्था

Pcmc Ganesh Visarajan :अनंत चतुर्दशीसाठी महापालिका सज्ज; ४१ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज. वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन जवान, जीवरक्षक आणि ४१ कृत्रिम तलावांची व्यवस्था.

by Admin
Spread the love

पिंपरी : गणेशोत्सवाच्या अंतिम विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रशिक्षित अग्निशमन जवान, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षकांची तैनाती करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरणपूरक विसर्जनाला महापालिकेने प्राधान्य दिले (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली (Pcmc Ganesh Visarajan)आहे.

 

विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका

 

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने विविध विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत आणि गरज भासल्यास रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित स्टाफ नर्स, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करण्यात आली (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

अग्निशमन विभागाचा बंदोबस्त

 

गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे प्रशिक्षित जवान विविध विसर्जनस्थळी तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष अग्निशमन वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र आणि जीवरक्षकांचीही तैनाती करण्यात आली(Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

अ, ड आणि फ क्षेत्रीय कार्यालयांत ४१ कृत्रिम तलाव

 

महापालिकेच्या उपलब्ध नोंदीनुसार अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात १०, ड क्षेत्रीय कार्यालयात ११ आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले (Pcmc Ganesh Visarajan) आहेत.

 

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्पाईन रोड, यमुनानगर, मोहननगर सांस्कृतिक भवन, गणेश तलावाजवळ सेक्टर २६ प्राधिकरण आणि नियोजित महापौर निवास मैदान, सेक्टर २७ प्राधिकरण येथे कृत्रिम हौद असलेली विसर्जन केंद्रे तयार करण्यात आली(Pcmc Ganesh Visarajan) आहेत.

 

तसेच ठाकरे मैदान, यमुनानगर, स्पाईन रोड, यमुनानगर, विठ्ठल मंदिर, आकुर्डी, सेंट उर्सुला शाळेजवळ, आकुर्डी, दुर्गे चौक, काळभोरनगर, मोहननगर सांस्कृतिक भवन आणि कै. पांडुरंग उर्फ काकाभाऊ सभागृह, आकुर्डी गावठाण येथे मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली(Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

४९ हजार ८०३ मूर्तींचे संकलन आणि विसर्जन

 

महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान शहरात एकूण ४९ हजार ८०३ गणेशमूर्तींचे संकलन आणि विसर्जन झाले आहे. यामध्ये १० हजार १७० पर्यावरणपूरक मूर्ती आणि ३९ हजार ६३३ पीओपी मूर्तींचा समावेश (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

२२ हजार ६४७ किलो निर्माल्य संकलित

 

निर्माल्य जलस्रोतांमध्ये जाऊ नये यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे. २३ सप्टेंबरपर्यंत एकूण २२ हजार ६४७.२५ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

नागरिकांनी फुले, हार, दुर्वा तसेच अन्य पूजासाहित्य नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेच्या निर्माल्य संकलन केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य

 

नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करावे. पर्यावरणाचे संरक्षण आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 

नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षित विसर्जनस्थळांचा वापर करावा तसेच वैद्यकीय पथके, अग्निशमन जवान, जीवरक्षक आणि अन्य आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले (Pcmc Ganesh Visarajan) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00