(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ने तब्बल दहा दिवस १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून साखळीचोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला. या कारवाईत दोन आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी जप्त करण्यात आली (PCMC Crime News) आहे.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. २३ सप्टेंबर रोजी तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे यांच्यासह पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आदर्शनगर, मोशी परिसरात शोध घेतला असता तीन संशयित आढळून(PCMC Crime News) आले.
ताब्यात घेऊन चौकशी केली असता इंदर अनिल राजपूत (वय २२, रा. आदर्शनगर, मोशी), महेश कान्हा राजपूत (वय २६, रा. मोहननगर, गोडावून चौक, मोशी) आणि एका विधिसंघर्षित बालकाचा त्यात समावेश असल्याचे निष्पन्न(PCMC Crime News) झाले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सेक्टर क्रमांक ४, प्राधिकरण, मोशी येथे रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची माहिती समोर आली. तसेच पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथून होंडा युनिकॉर्न दुचाकी चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त(PCMC Crime News) केली.
या कारवाईमुळे साखळीचोरीसह दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी यापूर्वीही विविध गुन्ह्यांत सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले (PCMC Crime News) आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोगनापल्ले करीत(PCMC Crime News) आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोहाडे, अजित रूपनवर, बाळासाहेब भांगळे, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्नील महाले, शशिकांत नांगरे आणि सचिन गोनटे यांनी कारवाईत सहभाग (PCMC Crime News) घेतला.
