Home गुन्हे PCMC Illegal Cables:अनधिकृत केबल्सवर पालिकेचा मोठा ॲक्शन; ऑपरेटर्सना ३० दिवसांची अंतिम मुदत

PCMC Illegal Cables:अनधिकृत केबल्सवर पालिकेचा मोठा ॲक्शन; ऑपरेटर्सना ३० दिवसांची अंतिम मुदत

प्राधिकरण परिसरातील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका ॲक्शन मोडमध्ये. अनधिकृत इंटरनेट आणि टीव्ही केबल्स हटवण्यासाठी ऑपरेटर्सना ३० दिवसांची मुदत; नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण परिसरात लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबल्समुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरभरातील अनधिकृत इंटरनेट आणि टीव्ही केबल्सविरोधात मोठी मोहीम हाती घेत आक्रमक भूमिका घेतली (PCMC Illegal Cables)आहे.

 

पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रशासनाने महापालिकेच्या विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या धोकादायक केबल्स हटवण्यासाठी संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादार आणि केबल ऑपरेटर्सना ३० दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित केबल्स थेट कापून जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला (PCMC Illegal Cables)आहे.

 

नागरिकांकडून तीव्र संताप

शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर आणि चौकांमध्ये लोंबकळणाऱ्या केबल्समुळे अपघाताचा धोका वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. मात्र प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याने प्राधिकरण येथील संपदा जोगळेकर या एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त (PCMC Illegal Cables)होत आहे.

 

“अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात (PCMC Illegal Cables)आहे .

 

विद्युत खांबांवरील केबल्स म्हणजे अतिक्रमण”

 

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, विद्युत खांबांचा कोणताही व्यावसायिक वापर परवानगीशिवाय करणे बेकायदेशीर आहे. अनधिकृत केबल्समुळे विद्युत यंत्रणेला धोका निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला (PCMC Illegal Cables)आहे.

 

पालिकेच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी केबल्सची अनियंत्रित जाळी तयार झाली असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढला (PCMC Illegal Cables)आहे.

 

भूमिगत नेटवर्क वापरणे बंधनकारक

 

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यापुढे ओव्हरहेड केबल्सना परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले (PCMC Illegal Cables)आहे.

 

ऑपरेटर्सना कागदपत्रांची मागणी

 

महापालिकेने इंटरनेट सेवा पुरवठादार आणि केबल ऑपरेटर्सना पुढील कागदपत्रे ३० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले (PCMC Illegal Cables)आहेत —

 

वैध व्यावसायिक परवाना

 

जीएसटी नोंदणी

 

एमएसएमई प्रमाणपत्र

 

शॉप अॅक्ट लायसन्स

 

केवायसी तपशील

 

केबल मार्गाचा नकाशा आणि तांत्रिक माहिती

 

 

नियमांचे पालन न केल्यास थेट कारवाई

 

निर्धारित मुदतीत नियमांचे पालन न करणाऱ्या ऑपरेटर्सच्या केबल्स थेट कापून जप्त केल्या जातील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे इंटरनेट किंवा टीव्ही सेवा खंडित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ऑपरेटर्सवर राहणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले (PCMC Illegal Cables)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00