Home गुन्हे Sambhajinagar Illegal Construction :संभाजीनगर उद्यानातील “त्या” अनधिकृत बांधकामावर अखेर फिरले बुलडोझर; PCMCची धडक कारवाई

Sambhajinagar Illegal Construction :संभाजीनगर उद्यानातील “त्या” अनधिकृत बांधकामावर अखेर फिरले बुलडोझर; PCMCची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवडच्या संभाजीनगरमधील सार्वजनिक उद्यानात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले. १०० हून अधिक झाडांची तोड झाल्याचा आरोप असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :ज्या अनधिकृत बांधकामामुळे पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय भूकंप झाला अखेर ते पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर परिसरात सार्वजनिक उद्यानाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुलडोझरच्या सहाय्याने हे संपूर्ण बांधकाम हटवून उद्यानाची जागा मोकळी केली. या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली (Sambhajinagar Illegal Construction) आहे.

 

प्रभाग क्रमांक ११ मधील या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून समाजमंदिराच्या नावाखाली सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम सुरू असल्याची चर्चा होती. यासाठी उद्यानातील १०० हून अधिक मोठ्या झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला होता. सुमारे दोन गुंठे जागेवर हे बांधकाम उभारले जात असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले (Sambhajinagar Illegal Construction) होते.

 

विशेष बाब म्हणजे, उद्यानाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि बांधकाम सुरू असतानाही महापालिकेच्या संबंधित विभागांना याची माहिती नसल्याचे समोर आले. उद्यान व स्थापत्य विभागाच्या भूमिकेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराला प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप(Sambhajinagar Illegal Construction) केला.

 

या संदर्भात प्रभागातील नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली होती. तसेच बांधकाम हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला (Sambhajinagar Illegal Construction) होता.

 

नागरिकांचा वाढता दबाव आणि तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेत अखेर अतिक्रमण विभागाने घटनास्थळी धडक कारवाई केली. संपूर्ण अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले असून आता वृक्षतोड आणि अतिक्रमण प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अधिक जोर धरत (Sambhajinagar Illegal Construction) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00