Home माझं पिंपरी चिंचवड Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; मातृपूजन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने

Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; मातृपूजन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मातृपूजन, शिक्षकांचा सत्कार, गायन, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला विशेष रंगत आणली.

by Admin
Spread the love

चिंचवड : कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कला केंद्र समितीच्या वतीने भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात (Pratibha Junior College)आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बारावीची विद्यार्थिनी आसावरी बदडे हिने सादर केलेल्या भावपूर्ण गायनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली, तर विद्यार्थिनींच्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद (Pratibha Junior College)दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या मातृपूजन उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या भावनिक क्षणांनी सभागृहातील वातावरण भारावून (Pratibha Junior College) गेले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळते, ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या आदरभावामुळे शिक्षकवृंदही भावूक (Pratibha Junior College)झाले.

समारोपप्रसंगी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी आयुष्यभर गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कार जपावेत, असे आवाहन (Pratibha Junior College)केले.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, डॉ. भूपाली शहा तसेच संचालिका डॉ. तेजल शहा यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक (Pratibha Junior College)केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे आणि विद्यार्थ्यांनी केले, तर सांस्कृतिक कला केंद्र समितीच्या प्रमुख प्रा. सुप्रिया चेडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती (Pratibha Junior College)लाभली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00