(पिंपरी, प्रतिनिधी ): नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्नात भेसळ करणारे, ग्राहकांची दिशाभूल करणारे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) केवळ कारवाई करणारी यंत्रणा नसून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळते की नाही, याची जबाबदारी पार पाडणारी यंत्रणा आहे, अशी स्पष्ट भूमिका एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी (Tukaram Mundhe FDA) मांडली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘खऱ्या अर्थाने जननायक’ या विशेष प्रकट मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार मयूरेश कोण्णुर यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी संवाद साधला. प्रशासनातील अनुभव, एफडीएच्या धडक कारवाया, अन्नभेसळ, ॲनालॉग पनीर, हॉटेलमधील स्वच्छता, ग्राहकांची जागरूकता, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष संवाद अशा विविध विषयांवर मुंढे यांनी मनमोकळेपणाने भाष्य (Tukaram Mundhe FDA)केले.
ॲनालॉग पनीरविरोधात कठोर भूमिका
अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील कारवाईमध्ये ॲनालॉग अर्थात नॉन-डेअरी पनीरचा मुद्दा विशेष चर्चेत आला आहे. दुधापासून तयार होणाऱ्या अस्सल पनीरच्या नावाखाली वनस्पतीजन्य तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटकांपासून तयार केलेले उत्पादन ग्राहकांना देणे ही गंभीर बाब असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट (Tukaram Mundhe FDA)केले.
एफडीएने राज्यात ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर वर्षभरासाठी बंदी लागू केली आहे. या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरर्सवरही झाला आहे. मात्र, निर्धारित अन्न सुरक्षा मानके पूर्ण करणाऱ्या अस्सल पनीरवर कोणतीही बंदी नसल्याचे त्यांनी स्पष्ट (Tukaram Mundhe FDA)केले.
३०८ नमुन्यांपैकी १०९ नमुने दोषी
एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेत राज्यभरातून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांमध्ये गंभीर बाबी समोर आल्या. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तपासलेल्या ३०८ नमुन्यांपैकी १०९ नमुने, म्हणजेच सुमारे ३५.४ टक्के नमुने दोषी आढळले. त्यापैकी ७९ नमुने निकृष्ट दर्जाचे, तर ३० नमुने आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट(Tukaram Mundhe FDA) झाले.
ग्राहकांची फसवणूक थांबविणे आवश्यक
एखादा पदार्थ पनीरसारखा दिसतो म्हणून तो पनीर ठरत नाही. ग्राहकाला आपण नेमके काय खरेदी करीत आहोत आणि काय खात आहोत, याची स्पष्ट माहिती मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. उत्पादनाच्या नावातून किंवा सादरीकरणातून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, यासाठी एफडीएची कारवाई आवश्यक असल्याचे मुंढे यांनी(Tukaram Mundhe FDA) सांगितले.
ॲनालॉग पनीरला पनीर म्हणून विकणे किंवा ते अस्सल पनीर असल्याचा भास निर्माण करणे हा केवळ नियमभंग नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना कोणताही दबाव स्वीकारला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी (Tukaram Mundhe FDA)मांडली.
हॉटेल, रेस्टॉरंटवरही कारवाईचा बडगा
एफडीएच्या पथकांकडून हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांची तपासणी सुरू आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक, कीटक नियंत्रण, अन्न हाताळण्याची पद्धत आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यांची तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाना निलंबित करण्यापासून कठोर कायदेशीर कारवाईपर्यंतची पावले उचलली जात (Tukaram Mundhe FDA)आहेत.
मुंढे यांनी सांगितले की, अलीकडे मुंबईतील काही नामांकित हॉटेल्स आणि क्लबवरही एफडीएने कारवाई केली आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवायांतून देण्यात आला (Tukaram Mundhe FDA)आहे.
भेसळयुक्त दूध, मिठाईवरही लक्ष
एफडीएची कारवाई केवळ पनीरपुरती मर्यादित नसून भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधातही कारवाई सुरू आहे. गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवरही धाडी टाकण्यात येत (Tukaram Mundhe FDA)आहेत.
‘एफडीएकडे तक्रार करा’
अन्नपदार्थाबाबत संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी गप्प न बसता प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन मुंढे यांनी केले. ग्राहकांची जागरूकता ही अन्न सुरक्षा व्यवस्थेतील महत्त्वाची कडी आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास प्रशासनाला कारवाई अधिक प्रभावीपणे करता येते, असे त्यांनी (Tukaram Mundhe FDA)सांगितले.
दारूविषयक तक्रारींचा मजेशीर किस्सा
एफडीएच्या कामकाजातील अनुभव सांगताना मुंढे यांनी दारूविषयक तक्रारींचाही एक मजेशीर किस्सा सांगितला. रात्रीच्या वेळी काही नागरिक एफडीएच्या हेल्पलाइनवर फोन करून दारूची चव योग्य नसल्याची किंवा दारू ‘चढत’ नसल्याची तक्रार करतात, असे त्यांनी सांगितले. एफडीएच्या कामाच्या व्याप्तीत दारूविषयक कारवाईचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट (Tukaram Mundhe FDA)केले.
सोशल मीडिया हेच जग समजण्याची चूक करू नका
बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना मुंढे यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबतही सावध केले. सोशल मीडिया हेच संपूर्ण जग आहे, अशी समजूत करून घेणे योग्य नाही. सोशल मीडियावर आपल्या विचारांशी जुळणारी माहिती वारंवार दिसत असल्याने दुसरी बाजू समजून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक विषयाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक (Tukaram Mundhe FDA)आहे.
सोशल मीडियामुळे संपर्काची साधने वाढली असली तरी प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. कुटुंब, मित्र आणि समाजातील व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधणे, समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्याची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करताना विवेक आणि प्रत्यक्ष संवादाची जोड असली पाहिजे, असा संदेश त्यांनी(Tukaram Mundhe FDA) दिला.
‘जबाबदारी मिळाली की कामाला सुरुवात’
आपल्या प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत बोलताना मुंढे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिस्थितीचा अभ्यास करून तातडीने कामाला सुरुवात करण्यावर भर असल्याचे सांगितले. कायदा, नियम आणि उपलब्ध अधिकारांच्या चौकटीत राहून नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेणे ही प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट (Tukaram Mundhe FDA)केले.
प्रशासन म्हणजे केवळ फाईलवर निर्णय घेणे नव्हे, तर त्या निर्णयाचा नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळणे हा प्रशासनाच्या कामाचा अंतिम उद्देश असला पाहिजे, अशी भूमिका त्यांच्या संवादातून समोर (Tukaram Mundhe FDA)आली.
नियम सर्वांसाठी समान
कोणताही व्यवसाय मोठा असो किंवा छोटा, अन्न सुरक्षा नियमांचे पालन प्रत्येकासाठी समान असले पाहिजे. ग्राहकांच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करता येणार नाही. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना अडचण येणार नाही; मात्र नियम मोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश तुकाराम मुंढे यांनी (Tukaram Mundhe FDA)दिला.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या एफडीएतील धडक कारवायांमुळे अन्न सुरक्षा हा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ॲनालॉग पनीरवरील बंदीपासून हॉटेल्सवरील तपासण्या, भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाई आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधातील मोहिमेपर्यंत एफडीएच्या कारवाईला वेग आला आहे. ‘अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड नाही’ हा स्पष्ट संदेश या कारवायांतून पुढे आला (Tukaram Mundhe FDA)आहे.





