Home माझं पिंपरी चिंचवड Comred Vinayak Chakre:झुंजार कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे निधन

Comred Vinayak Chakre:झुंजार कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे निधन

पिंपरी-चिंचवडमधील झुंजार कामगार नेते आणि ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. कामगार चळवळ व पत्रकारितेत मोठे योगदान.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १७ : पिंपरी-चिंचवडमधील कामगार चळवळीतील झुंजार नेतृत्व आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे कॉम्रेड विनायक गंगाधर चक्रे (वय ७९) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे संत तुकारामनगर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार (Comred Vinayak Chakre) आहे.

 

१९८०-९० च्या दशकात पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील कामगार चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. बजाज ऑटो, टेल्को, बजाज टेम्पो, गरवारे नायलॉन्स आदी कंपन्यांतील कामगार आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. डेव्हिड ब्राऊन ग्रीव्हज कंपनीतून सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णवेळ कामगार चळवळीसाठी वाहून (Comred Vinayak Chakre) घेतले.

 

विविध उद्योगांतील वेतन करार, कामगारांचे प्रश्न आणि हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. अनेक संप व आंदोलनांत त्यांचा पुढाकार राहिला. पत्रकारितेतही त्यांनी ठसा उमटवत दैनिक सामना, लोकसत्ता आणि महाराष्ट्र हेराल्डमध्ये काम केले. लोकसत्तामध्ये ‘वरद विनायक’ या टोपणनावाने त्यांनी कामगार विषयक सदर लिहून विशेष ओळख निर्माण (Comred Vinayak Chakre)केली.

 

त्यांच्या निधनाने प्रखर, प्रामाणिक कामगार नेता, परखड पत्रकार आणि कामगार चळवळीतील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील ख्रिश्चन दफनभूमीत आज दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार (Comred Vinayak Chakre)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00