Home आरोग्य PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

पिंपरी-चिंचवडला ठोकरवाडी धरणातून ६०० एमएलडी पाणी आणण्याचे महापालिकेचे नियोजन. भामा आसखेड, आंद्रा आणि पवना बंद जलवाहिनी प्रकल्पांवरही भर.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी 11सप्टेंबर 2026):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून शहरासाठी ६०० एमएलडी पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी(PCMC Water Supply) दिली.

 

सध्या शहराला पवना धरणातून सुमारे ५५० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि एमआयडीसीकडून सुमारे ३० एमएलडी पाणी मिळते. भामा आसखेड धरणातून भूमिगत जलवाहिनीने १६७ एमएलडी पाणी आणण्याचे काम सुरू असून, फेब्रुवारी २०२७ पर्यंत हे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता (PCMC Water Supply)आहे.

 

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पालाही महापालिकेने प्राधान्य दिले असून, सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून ७५० एमएलडी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी (PCMC Water Supply) सांगितले.

 

आंद्रा धरणातून थेट पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीची निविदाही लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून, त्यातून आणखी १०० एमएलडी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता(PCMC Water Supply) आहे.

 

४० टक्के पाणीगळती रोखण्यावर भर

 

नवीन पाणीस्रोतांसोबतच पाणीगळती रोखण्यावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुमारे ४० टक्के पाणीगळती होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सुमारे एक लाख घरगुती नळजोडण्यांना स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याचे नियोजन असून, २५० किलोमीटर लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत. तसेच पाणीवितरण व्यवस्थेवर नियंत्रणासाठी SCADA प्रणाली लागू केली जाणार(PCMC Water Supply) आहे.

 

ठोकरवाडी धरणातून प्रस्तावित ६०० एमएलडी पाणी, भामा आसखेड, आंद्रा आणि पवना बंद जलवाहिनी प्रकल्पांमुळे भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठी बळकटी मिळण्याची अपेक्षा (PCMC Water Supply) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00