Home माझं पिंपरी चिंचवड Mayor Ravi Landge:पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला मंजुरी

Mayor Ravi Landge:पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला मंजुरी

अझरबैजान येथील ‘वर्ल्ड अर्बन फोरम’ परिषदेसाठी ८.८० लाखांचा खर्च मंजूर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आणि अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले (Mayor Ravi Landge) आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेतर्फे अझरबैजान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड अर्बन फोरम’च्या तेराव्या अधिवेशनासाठी महापौर रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. १७ ते २२ मेदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने सुमारे ८ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली (Mayor Ravi Landge)आहे.

 

मात्र, पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत आणि खर्च नियंत्रणाचा संदेश दिल्यानंतर या परदेश दौऱ्यावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः सध्याच्या आर्थिक आणि जागतिक परिस्थितीत अशा दौऱ्यांची गरज कितपत आहे, यावर चर्चा सुरू झाली(Mayor Ravi Landge) आहे.

 

दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना महापौर रवी लांडगे यांनी हा दौरा वैयक्तिक नसून शहर विकास आणि शहरी नियोजनाशी संबंधित महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी असल्याचे स्पष्ट केले. “मी पर्यटनासाठी जात नाही. शहराच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विषयांवर अभ्यास आणि संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे,” असे त्यांनी (Mayor Ravi Landge)सांगितले.

 

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास दौरे रद्द करण्याबाबत आदेश दिल्यास त्यामध्ये आपल्या दौऱ्याचाही समावेश असेल, तर आपण परदेश दौरा रद्द करू, असेही लांडगे यांनी स्पष्ट केले(Mayor Ravi Landge) आहे.

 

त्यामुळे आता महापौर नियोजित अझरबैजान दौऱ्यावर जाणार की शेवटच्या क्षणी तो रद्द होणार, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले (Mayor Ravi Landge)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00