पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षातील निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला.“आता गप्प बसू नका. चुकीच्या कामाविरोधात आक्रमक व्हा. निर्भीडपणे बोला,” असे सांगत त्यांनी नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन (NCP Ajit Pawar Group )केले.
बैठकीदरम्यान निवडणूक निकालांचा आढावा घेताना पवार यांनी काही आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर थेट टीका केली. “काही जण निवडणूक न लढताच मैदानाबाहेर राहिले. प्रचारात अपेक्षित सहभाग नोंदवला गेला नाही. ही बाब चुकीची होती,” असे ते (NCP Ajit Pawar Group )म्हणाले.
तीन प्रभागांतील पॅनेल प्रमुखांचे कौतुक
महापालिकेच्या ३२ प्रभागांपैकी केवळ तीन प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडून आले. प्रभाग क्रमांक ९, २० आणि २१ मध्ये पक्षाचे पॅनेल विजयी झाले. या यशस्वी पॅनेलचे नेतृत्व करणारे राडूल घोसले, योगेश बहल आणि संदीप लामेरे यांचे अजित पवार यांनी विशेष कौतुक केले. “चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार केला, म्हणूनच हे यश मिळाले,” असे त्यांनी नमूद (NCP Ajit Pawar Group )केले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदासह विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राहुल भोसले आणि माजी महापौर वैशाली घोडेकर यांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे.
“जो चुकीच्या कामाविरोधात ठामपणे उभा राहील आणि आक्रमक भूमिका घेईल, त्यालाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल,” असे संकेत अजित पवार यांनी (NCP Ajit Pawar Group ) दिले.
निष्क्रियतेवर नाराजी, आक्रमकतेचा मंत्र
निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी स्वतः शहरात फिरून प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर महापालिकेतील कथित गैरकारभाराबाबत टीका करत त्यांनी १५ हून अधिक जाहीर सभा घेतल्या. तरीही अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त (NCP Ajit Pawar Group )केली.
“चुकीच्या कामाला विरोध करा. अन्यायाविरोधात आवाज उठवा. पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहा,” अशा स्पष्ट सूचना देत त्यांनी नव्या पिढीतील नगरसेवकांना सभागृहाचे कामकाज समजून घेण्याचा, नियमित उपस्थित राहण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा सल्ला दिला. “मी तुमच्या पाठीशी उभा आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त (NCP Ajit Pawar Group ) केला.
दरम्यान, गटनेत्याच्या निवडीबाबत चर्चा सुरू असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शहराध्यक्ष योगेश बहल यांनी (NCP Ajit Pawar Group )दिली.
