Home माझं पिंपरी चिंचवड Pratibha College Chinchwad :प्रतिभा कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन, सायबर सुरक्षा जनजागृतीची शपथ

Pratibha College Chinchwad :प्रतिभा कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन, सायबर सुरक्षा जनजागृतीची शपथ

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन, 'युवान' उपक्रम, सायबर सुरक्षा जनजागृती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

by Admin
Spread the love

(चिंचवड,प्रतिनिधी ता. ३) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास रेडिओ सिटीच्या आरजे शोनाली तसेच ‘युवान’ संस्थेचे सदस्य अक्षय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांचे मार्गदर्शन(Pratibha College Chinchwad) लाभले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी उपस्थित होत्या. यावेळी उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे तसेच विभाग समन्वयिका डॉ. श्रुती गणपुले यांची प्रमुख उपस्थिती (Pratibha College Chinchwad)होती.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन व सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात(Pratibha College Chinchwad) आले.

प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय, खादी वस्त्रांचा वापर, नियमित व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवन या चार महत्त्वपूर्ण बाबींचे महत्त्व पटवून (Pratibha College Chinchwad)दिले.

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘युवान’ उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच क्वीक हिल आणि महाविद्यालयाच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा क्लब’च्या वतीने समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीची शपथ देण्यात(Pratibha College Chinchwad) आली.

कार्यक्रमात पथनाट्य व नृत्य सादरीकरणाने रंगत आणली. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे २५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी (Pratibha College Chinchwad)केली.

कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. ज्योती इंगळे, डॉ. शकुंतला देवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार (Pratibha College Chinchwad)पडला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00