(चिंचवड, ता. ४) : चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई)मध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा केला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राधा-कृष्णाच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून (Pratibha International School)घेतले.
शाळेच्या प्रांगणाची फुले, मोरपिसे आणि मटक्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भजन, गोपाळकाला तसेच श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर करून उपस्थितांची दाद (Pratibha International School)मिळवली.
विद्यार्थ्यांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडण्याचा उत्साहपूर्ण प्रयत्न केला. यावेळी ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून(Pratibha International School) गेला.

शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित बोधकथा सांगून विद्यार्थ्यांना सत्य, प्रेम आणि धर्माचे महत्त्व समजावून सांगितले. धार्मिक परंपरा, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश(Pratibha International School) होता.
यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृंदा जोशी, उपमुख्याध्यापिका लिजा सोझु यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Pratibha International School)होते.
कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्राचार्या डॉ. वृंदा जोशी, उपमुख्याध्यापिका लिजा सोझु आणि शिक्षकांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात(Pratibha International School) आले.
