Home माझं पिंपरी चिंचवड Kamala Education Society:प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा १२वी CBSE बोर्डात १०० टक्के निकाल

Kamala Education Society:प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा १२वी CBSE बोर्डात १०० टक्के निकाल

चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने इयत्ता १२वी CBSE बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. गायत्री कुंभार प्रथम, ओंकार गायकवाड द्वितीय तर अनशूल पनवेलकर तृतीय.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल School ने यंदाच्या इयत्ता १२वी (CBSE) बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला (Kamala Education Society)आहे.

 

या परीक्षेत गायत्री कुंभार हिने ९६.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि योगा या विषयांत प्रत्येकी ९९ गुण मिळवून विशेष प्रावीण्य (Kamala Education Society)मिळवले.

 

ओंकार गायकवाड याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात त्याने १०० पैकी ९९ गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध (Kamala Education Society)केली.

 

अनशूल पनवेलकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वेदांत पाटील, क्रितीग्या सिंग, अक्षय उलियाथ आणि आदित्य यांनीही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन (Kamala Education Society)केले.

 

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा तसेच संचालिका डॉ. तेजल शहा यांनी शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा(Kamala Education Society) दिल्या.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00