Home आरोग्य PCMC Encroachment Action:जॉगर्स पार्क प्रकरण : बेकायदा बांधकाम आणि वृक्षतोडीवर कारवाईची मागणी

PCMC Encroachment Action:जॉगर्स पार्क प्रकरण : बेकायदा बांधकाम आणि वृक्षतोडीवर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकाम आणि २०० हून अधिक झाडांच्या बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :प्रभाग क्रमांक ११ मधील मैलाशुद्धीकरण (जॉगर्स पार्क) प्रकल्प परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकाम आणि मोठ्या प्रमाणातील बेकायदा वृक्षतोडीप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली(PCMC Encroachment Action) आहे.

 

भापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जॉगर्स पार्कच्या जागेत सुमारे २०० ते २५० झाडांची बेकायदेशीर कत्तल करून मागील पाच महिन्यांपासून अनधिकृत आरसीसी बांधकाम सुरू होते. या प्रकाराबाबत स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक निलेश नेवाळे, रिटा सानप, कुंदन गायकवाड तसेच विविध पर्यावरणवादी संघटनांनी वेळोवेळी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला (PCMC Encroachment Action) आहे.

 

या बांधकामासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी आमदार निधीतून काम करण्याबाबत पत्र दिले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी महापौर मंगलाताई कदम यांनी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या वादाचे पडसाद प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही उमटले (PCMC Encroachment Action) होते.

 

यानंतर महापालिका प्रशासनाने जॉगर्स पार्क परिसरातील सुमारे १५०० चौ.मी. क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. मात्र, अनधिकृत बांधकाम आणि वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे भापकर यांनी नमूद केले (PCMC Encroachment Action)आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली (PCMC Encroachment Action) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00