प्रतिनिधी :रावेत परिसरात मुक्या श्वानावर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात (Dog Abuse Case)आहे.
याप्रकरणी प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय २६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र रघुनाथ शाहू (वय ३५, रा. रावेत, मूळ ओडिशा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू (Dog Abuse Case)आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रावेतमधील कॅफे डेस्टीनेशन परिसरात आरोपी संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्यानंतर त्याने एका भटक्या श्वानाला पकडून त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला( Dog Abuse Case)आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर प्राणीप्रेमी संघटना आणि नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास रावेत पोलीस करत(Dog Abuse Case) आहेत.
