Home क्रीडा RCB vs DC : आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय; ९ विकेट्स राखून सामना खिशात

RCB vs DC : आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय; ९ विकेट्स राखून सामना खिशात

आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला ७५ धावांत गुंडाळत ९ विकेट्सने शानदार विजय मिळवला. भुवनेश्वर, हेजलवूड आणि पडिक्कल चमकले.

by Admin
Spread the love

विवेक कुलकर्णी :आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी झंझावाती खेळी करत दिल्लीचा ९ विकेट्स राखून पराभव (RCB vs DC) केला.

 

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. आरसीबीच्या अचूक आणि आक्रमक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव केवळ ७५ धावांत संपुष्टात आला. विशेष म्हणजे दिल्लीचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १७ षटकांच्या आतच सर्वबाद (RCB vs DC)झाला.

 

आरसीबीकडून अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांनी घातक गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. त्यांच्या माऱ्यासमोर दिल्लीच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडाली. अभिषेक पोरेल, डेव्हिड मिलर आणि जेमीसन यांनी काहीशी झुंज दिली, मात्र इतर सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली (RCB vs DC) नाही.

 

७६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. अवघ्या ७ षटकांत केवळ एक गडी गमावत बंगळुरूने लक्ष्य सहज पार केले. त्यामुळे तब्बल ९ विकेट्स आणि ७८ हून अधिक चेंडू राखून आरसीबीने मोठा विजय (RCB vs DC) नोंदवला.

 

फलंदाजीत देवदत्त पडिक्कलने तुफानी फटकेबाजी करत अवघ्या १३ चेंडूत ३४ धावा केल्या. तर विराट कोहलीने १५ चेंडूत नाबाद २३ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब (RCB vs DC) केले.

 

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय भुवनेश्वर कुमार आणि हेजलवूड यांनी अचूक गोलंदाजीने योग्य (RCB vs DC) ठरवला.

 

या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेतील अव्वल चारमधील स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची निराशाजनक कामगिरी कायम राहिल्याने त्यांच्या प्लेऑफच्या आशांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले (RCB vs DC) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00