निगडी , दि. ०४ मे २०२६ : “जगातील सांस्कृतिक पडझडीचा विचार करता मार्क्सवादाने सांस्कृतिक क्रांती घडवली, ही केवळ भ्रांती आहे. भारतात मार्क्सवाद कधीच रुजला नाही,” असे ठाम प्रतिपादन प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी केले. निगडी प्राधिकरण, पेठ क्रमांक २५ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला २०२६’च्या अंतिम सत्रात ते बोलत होते. याच सत्राने तीन दिवसीय व्याख्यानमालेची सांगता (Shivaji Maharaj Vyakhyanmala) झाली.
‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर भाष्य करताना प्रा. देशपांडे यांनी मार्क्सवादाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक पैलूंवर सखोल विश्लेषण केले. “कार्ल मार्क्सने मांडलेला क्रांतीचा सिद्धांत प्रामुख्याने आर्थिक मूल्यांवर आधारित असून त्याचा संस्कृतीशी थेट संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. युरोपातील एकेश्वरवादी परंपरा, धार्मिक संघर्ष आणि झेनोफोबिया या मानसिकतेतून सांस्कृतिक संघर्ष उद्भवल्याचेही त्यांनी नमूद(Shivaji Maharaj Vyakhyanmala) केले.
“भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे मार्क्सवादासारख्या एकरेषीय विचारसरणीला येथे स्थान मिळाले नाही,” असे सांगत त्यांनी समाजाने परकीय विचारप्रवाहांविषयी सजग राहण्याचे आवाहन (Shivaji Maharaj Vyakhyanmala) केले.
या कार्यक्रमास उद्योजक किरण गारवे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सतीश सगदेव व चंद्रशेखर जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. समृद्धी पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीराम काळे यांनी आभार मानले. कायरा श्रीराम पोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘वंदे मातरम्’च्या सामुदायिक गायनाने व्याख्यानमालेची उत्साहात सांगता (Shivaji Maharaj Vyakhyanmala) झाली.
