पिंपरी-चिंचवड : अंमली पदार्थ विरोधी पथकाने दापोडी परिसरात छापा टाकून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करत सुमारे १६ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Dapodi Illegal Liquor) आहे.
याबाबत पोलीस शिपाई निखील बाळासाहेब वर्षे (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण काशीनाथ सूर्यवंशी (वय ३२, रा. दापोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला( Dapodi Illegal Liquor) आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीतील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी परिसरात आरोपीकडून विनापरवाना दारू विक्री सुरू होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता आरोपीकडून विक्रीसाठी ठेवलेला सुमारे १६,१९५ रुपये किमतीचा प्रोव्हिबिशनचा माल जप्त करण्यात ( Dapodi Illegal Liquor)आला.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार पाटील पुढील तपास करत ( Dapodi Illegal Liquor) आहेत.
