Home आरोग्य Medical College Scam:भारताच्या वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचाराचे वास्तव

Medical College Scam:भारताच्या वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचाराचे वास्तव

डीच्या कारवाईत वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोरी, बनावट निरीक्षणे आणि मान्यता घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव उघड. शिक्षण-आरोग्य व्यवस्थेला मोठा धोका.

by Admin
Spread the love

(खास बातमी )उद्याचे डॉक्टर घडवणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे पडावेत आणि आरोपींच्या यादीत स्वतः कुलपतींचा समावेश असावा, हे आजच्या व्यवस्थेचे विदारक वास्तव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या तपासणीची आगाऊ माहिती खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना देण्याच्या बदल्यात कोट्यवधींच्या लाचखोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात ईडीने नुकतीच कारवाई केली असून, धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी एकजण हे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या ख्यातकीर्त संस्थेचे कुलपती उद्याचे डॉक्टर घडवणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे पडावेत आणि आरोपींच्या यादीत स्वतः कुलपतींचा समावेश असावा, हे आजच्या व्यवस्थेचे विदारक वास्तव (Medical College Scam )आहे.  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकाऱ्यांनी हे रॅकेट उभारले होते. मंत्रालयातील गोपनीय माहिती, फाइल्सची छायाचित्रे खासगी महाविद्यालयांना पाठवली जात होती. त्यामुळे निरीक्षण पथक येण्याआधीच महाविद्यालयांना सर्व तपशील मिळत असे. त्यानुसार हे महाविद्यालये बोगस रुग्ण आणि बोगस कर्मचारी दाखवून मान्यता मिळवण्याची व्यवस्था करत असत. याच्या मोबदल्यात मंत्रालय आणि नॅशनल मेडिकल कमिशनमधील उच्चाधिकाऱ्यांना लाखो रुपये देण्यात येत (Medical College Scam)होते.

आपल्या देशातील वैद्यकीय शिक्षणाला परंपरेने जगभरात प्रतिष्ठा आहे. पण या घडामोडींनी संपूर्ण व्यवस्थेचा पाया हादरवून टाकला आहे. महाराष्ट्रासह दहा राज्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांवर ईडीने केलेल्या छापेमारीत शिक्षणपद्धतीतील भ्रष्टाचार आता अपवाद नसून नियम बनल्याचे भयंकर वास्तव समोर आले. लाचखोरी, मान्यता प्रक्रियेत फेरफार, बनावट निरीक्षण अहवाल, बनावट प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या जागांचा व्यापार, पालकांची फसवणूक — हा सर्वच काळाबाजार उघड झाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांमधील (Medical College Scam) चित्रही हेच.

या घोटाळ्याचा मुख्य प्रश्न पैसा नाही, तर विश्वासाचा आहे. एखादा विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो, तेव्हा तो भविष्यातील रुग्णांची जबाबदारी स्वीकारत असतो. परंतु जे लोक वैद्यकीय शिक्षणालाच लाचखोरीच्या जाळ्यात ओढतात, ते थेट देशाच्या आरोग्यव्यवस्थेशी खेळ करत असतात. जर डॉक्टर निर्माण होण्यासाठीची प्रक्रिया बनावट कागदपत्रांवर उभी असेल, तर उद्या रुग्णालयात जाणारा प्रत्येक नागरिक धोक्यात( Medical College Scam)आहे.

महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर, काही वर्षांत येथे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या प्रचंड वाढली. राज्यातील MBBS जागांचा देशातील हिस्सा वाढला; मात्र या वाढीच्या मागे भ्रष्टाचार असेल, तर ही वाढ विकास नव्हे, तर धोक्याचा इशारा आहे. हितसंबंधांच्या साखळीमुळे कारवाईला खीळ बसते. शिक्षणसम्राटच आरोग्यमंत्री असतील, तर महाविद्यालयांवरील कारवाई कोण (Medical College Scam)करणार?

खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्णलूट आधीच सुरू असताना, डॉक्टर होण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या प्रचंड शुल्कामुळे परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे. महाविद्यालयात येणे-न-येणे महत्त्वाचे नसते; महत्त्वाचा असतो पैसा. भरमसाठ पैसे मोजून पदवी मिळवायची आणि नंतर ती रुग्णांवर वसूल करायची — हा व्यापारी व्यवहार उघडपणे चालू आहे. आरोग्य ही सेवा नाही आणि शिक्षण हे व्रत नाही; सर्वत्र बाजारच दिसत आहे, तेही कोणत्याही( Medical College Scam )नियंत्रणाविना.

शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक फी आकारल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून येत होत्या; पण संबंधित संस्थांना राजकीय आश्रय असल्याने कारवाई होत नव्हती. हा मुद्दा सामाजिक न्यायाच्याही दृष्टीने तितकाच  (Medical College Scam)महत्त्वाचा आहे.

ताजी कारवाई क्लेशकारक असली, तरी ती आश्वासकही आहे. व्यवस्थेचा खरा चेहरा उघड झाला आहे. अनेकांच्या दिमाखदार प्रतिमांची लायकी लोकांसमोर आली आहे. हे उघडणे आवश्यक होते. आता या आरोपींना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय पाठराखण न देता कडक शिक्षा झाली पाहिजे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक केल्याशिवाय निरोगी समाजाची उभारणी कधीच शक्य (Medical College Scam )नाही.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00