प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक हालचाल वेग घेत असून, आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १४ डिसेंबर २०२५) चिंचवड येथे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी तसेच महायुतीबाबतची भूमिका स्पष्ट (PCMC Shivsena)करण्यात आली.
ही बैठक चिंचवडे लॉन्ससमोर, बिर्ला हॉस्पिटलजवळील ब्रिज परिसरातील हॉटेल रिव्हर व्ह्यू बँकेट हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. शिवसेना सचिव, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सिद्धेश रामदास कदम आणि शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (PCMC Shivsena)होते.
मार्गदर्शन करताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली असून, आगामी निवडणुकीतही संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास याच्या जोरावर सक्षमपणे मैदानात उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी (PCMC Shivsena)व्यक्त केला.
महायुतीबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतःकडे आहेत. महायुतीबाबत शिवसेना सकारात्मक असून, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी(PCMC Shivsena) नमूद केले.
देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खासदार बारणे यांनी काँग्रेस पक्षावर टीका करत नेतृत्वाच्या अभावामुळे पक्ष अडचणीत सापडल्याचे म्हटले. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत एनडीए सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा ठाम दावा त्यांनी (PCMC Shivsena)केला.
या वेळी संपर्कप्रमुख सिद्धेश कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांकडून होत असलेल्या वायफळ वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. बूथ पातळीवरील काम, जनतेशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांचे आकलन आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर भर देण्याचे आवाहन(PCMC Shivsena )त्यांनी केले.
बैठकीस शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, उपनेते इरफान सय्यद, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख . निलेश तरस, जिल्हा संघटिका शीला भोंडवे, शहर संघटिका सरिता साने, युवासेना अध्यक्ष (मावळ लोकसभा) श्राजेंद्र तरस, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे आणि युवासेना शहरप्रमुख माऊली जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित (PCMC Shivsena)होते.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी नेत्यांचे उत्साहात स्वागत केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक मजबूत करण्याचा, बूथ पातळीवर तयारी वाढवण्याचा, इच्छुक उमेदवारांच्या समन्वयातून निवडणूक रणनीती राबवण्याचा आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी वेगाने सुरू झाल्याचे(PCMC Shivsena ) स्पष्ट झाले आहे.
