Home प्रेरणा / यशकथा Savarkar Mandal:छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला : प्रदीप रावत व जगन्नाथ लडकत यांचे विचारपूर्ण मार्गदर्शन

Savarkar Mandal:छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला : प्रदीप रावत व जगन्नाथ लडकत यांचे विचारपूर्ण मार्गदर्शन

निगडीतील छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत प्रदीप रावत यांनी धर्मस्वातंत्र्य विषयावर भाष्य केले, तर जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमावर प्रकाश टाकला.

by Admin
Spread the love

पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला’ उत्साहात पार पडत असून, या व्याख्यानमालेतील प्रथम व द्वितीय पुष्पात इतिहास, समाज आणि विचारप्रवाह यांवर सखोल मांडणी करण्यात (Savarkar Mandal ) आली.

 

व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात माजी खासदार प्रदीप रावत यांनी ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर भाष्य करताना सहिष्णू समाजाने असहिष्णू विचारांना ठामपणे विरोध केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. भारताच्या इतिहासातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रयत्न, इंग्रजांची फूट पाडण्याची नीती आणि देशाच्या फाळणीपर्यंतचा प्रवास यावर त्यांनी विविध संदर्भांसह भाष्य केले. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान हक्क मिळतात, मात्र धर्माच्या आधारावर लौकिक लाभ मिळू नयेत यासाठी समान नागरी कायद्याची गरज त्यांनी अधोरेखित (Savarkar Mandal) केली.

 

या वेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश आफळे, अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे उपस्थित होते. डॉ. अजित जगताप यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची माहिती (Savarkar Mandal) दिली.

 

द्वितीय पुष्पात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. केवळ जातीच्या चौकटीत अडकवून बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चाळीस लढायांमध्ये अपराजित राहिलेले बाजीराव हे अत्यंत पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले सेनानी होते. पालखेडची लढाई ही जगातील सर्वोत्तम रणनितींच्या उदाहरणांपैकी एक मानली जाते, असे त्यांनी (Savarkar Mandal) सांगितले.

 

तसेच बुंदेलखंडातील मोहिम, छत्रसाल यांना दिलेली मदत, तसेच मस्तानीशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ यांचा उल्लेख करत त्यांनी बाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. नवीन पिढीपर्यंत हा प्रेरणादायी इतिहास पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी(Savarkar Mandal) केले.

 

या सत्राला प्राचार्य भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय विविध संयोजकांनी करून दिला, तर शेवटी आभारप्रदर्शन व राष्ट्रगीताने समारोप करण्यात(Savarkar Mandal) आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00