Home माझं पिंपरी चिंचवड Vikrant Bagade:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती

Vikrant Bagade:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर दीड महिन्यांनंतर नियुक्ती झाली आहे. ग्रामविकास विभागातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे

by Admin
Spread the love


प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर दीड महिन्यांपासून असलेली रिक्तता अखेर संपुष्टात आली आहे. ग्रामविकास विभागातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा अधिकृत आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली(Vikrant Bagade) आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ वर्गात मोडत असून, येथे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे प्रतिनियुक्तीने भरली जातात, तर एक पद स्थानिक अधिकाऱ्यासाठी राखीव आहे. राज्य सेवेतील नियोजन विभागातील अधिकारी प्रदीप जांभळे-पाटील यांची प्रतिनियुक्ती ३१ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली होती. महापालिकेतील निवडणूकविषयक कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्यांना १५ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाले(Vikrant Bagade) होते.

 

सध्या मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर हे उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्तपदांवर (Vikrant Bagade)कार्यरत आहेत.

 

दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी मोनिका ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, नगरविकास विभागाचा अधिकृत आदेश नसणे तसेच त्या वेळी महापालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्तांची पदे भरलेली असल्याने त्यांची प्रत्यक्ष नियुक्ती रखडली होती. जांभळे-पाटील यांची सेवा समाप्त झाल्यानंतर ठाकूर यांची नियुक्ती होण्याची (Vikrant Bagade)शक्यता व्यक्त केली जात होती.

 

मात्र, राज्य शासनाने अखेर मोनिका ठाकूर यांच्याऐवजी ग्रामविकास विभागातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (Vikrant Bagade)नियुक्ती केली आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00