पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:निवडणुका जवळ आल्या की पक्षांतर, आयाराम-गयाराम संस्कृती आणि तिकीटाच्या राजकारणाला उधाण येते, हे चित्र राज्यभरात नवे नाही. मग ती ग्रामपंचायत असो किंवा श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असो. सध्या भाजपच्या वाढत्या राजकीय बळामुळे आणि सत्तेतील खात्रीशीर स्थानामुळे अनेक इच्छुक नेत्यांसाठी भाजप हा ‘सेफ झोन’ ठरत असल्याचे चित्र दिसून येत (BJP protest PCMC) आहे.
गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली असली, तरी याच पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आज स्पष्टपणे समोर( BJP protest PCMC)आले.
माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि अमित गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे निगडी–आकुर्डी परिसरातील जुने, निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. याच नाराजीचा उद्रेक आज थेट आंदोलनाच्या(BJP protest PCMC) रूपाने झाला.
भक्ती-शक्ती चौकात आत्मक्लेश आंदोलन
आज सकाळी भक्ती-शक्ती चौकात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिस्त मोडत थेट आत्मक्लेश आंदोलन केले. पक्ष नेतृत्वाने ‘आयात उमेदवारां’ना प्राधान्य देऊ नये, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी( BJP protest PCMC)घेतली.
या आंदोलनात माजी महापौर आर. एस. कुमार, विजय सिनकर, समीर जावळकर, सलीम शिकलगार, अरुण थोरात, अतुल इमानदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. “पक्ष वाढवण्यासाठी रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच डावलले जात असेल, तर हे अन्यायकारक आहे,” अशा जोरदार घोषणा देत त्यांनी थेट एल्गार करण्याची भाषा( BJP protest PCMC)वापरली.
भाजपमधील शिस्तीवर प्रश्नचिन्ह
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. “भाजपमधील शिस्त पाहता हे दृश्य म्हणजे नवलच आहे,” अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड परिसरात उमटत (BJP protest PCMC)आहे.
पक्ष नेतृत्वाची कसोटी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षांतर्गत असंतोष उफाळून आल्याने भाजप नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आयाराम नेत्यांना सामावून घेताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष कसा शांत केला जाणार, आणि उमेदवारी वाटपात समतोल कसा साधला जाणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार की पक्ष नेतृत्व वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती सावरते, हे पाहणे औत्सुक्याचे( BJP protest PCMC)ठरणार आहे.
