Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Vote Counting:पिंपरी-चिंचवड महापालिका : मतमोजणीचा ‘मास्टर प्लॅन’ सज्ज; कोणत्या प्रभागात किती फेऱ्या? वाचा सविस्तर

PCMC Vote Counting:पिंपरी-चिंचवड महापालिका : मतमोजणीचा ‘मास्टर प्लॅन’ सज्ज; कोणत्या प्रभागात किती फेऱ्या? वाचा सविस्तर

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2026 साठी मतमोजणीचा सविस्तर मास्टर प्लॅन तयार. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रभाग, मतदान केंद्रे, टेबल्स व मतमोजणी फेऱ्यांची संपूर्ण माहिती वाचा.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराचा नवा कारभारी कोण, याचा फैसला होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मतमोजणीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतमोजणीसाठी लागणाऱ्या टेबल्सची संख्या तसेच मतदान केंद्रांच्या संख्येनुसार होणाऱ्या फेऱ्यांचे सविस्तर गणित मांडण्यात आले (PCMC Vote Counting)आहे.

१. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय (RO-1) : मतमोजणी तपशील

या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण पाच प्रभागांची मतमोजणी पार पडणार आहे.

प्रभाग १९ : येथे सर्वाधिक ७२ मतदान केंद्रे असून मोजणीसाठी १८ फेऱ्या होणार आहेत. यासाठी ४ मुख्य टेबल्स आणि १ टपाली मोजणी टेबल असणार आहे.

प्रभाग १४ : ७० मतदान केंद्रे असून १८ फेऱ्यांमध्ये निकाल स्पष्ट होईल.

प्रभाग १० : ६६ मतदान केंद्रे असून १७ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रभाग १५ : ६० मतदान केंद्रे असून १५ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल.

प्रभाग १ : केवळ २ मतदान केंद्रे असून ५ फेऱ्यांत मोजणी होईल. मात्र, येथे टपाली मोजणीसाठी सर्वाधिक ४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

२. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय (RO-2) : मतमोजणी तपशील

या कार्यालयांतर्गत चार मुख्य प्रभागांसह प्रभाग क्रमांक १ च्या काही भागाची मतमोजणी होणार आहे.

प्रभाग २२ : ६८ मतदान केंद्रे असून मोजणीसाठी ५ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १४ फेऱ्यांत पूर्ण होईल.

प्रभाग १७ : ६४ मतदान केंद्रे असून १६ फेऱ्या होणार आहेत.

प्रभाग १८ : ६३ मतदान केंद्रे असून १६ फेऱ्यांचे नियोजन आहे.

प्रभाग १६ : सर्वाधिक ९७ मतदान केंद्रे असून १४ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल. यासाठी ७ टेबल्सची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

३. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय (RO-7) : मतमोजणी तपशील

या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रामुख्याने दोन मोठ्या प्रभागांची मतमोजणी होणार आहे.

प्रभाग २७ : ६१ मतदान केंद्रे असून १६ फेऱ्या होतील. यासाठी ४ मुख्य टेबल्स आणि १ टपाली मोजणी टेबल ठेवण्यात आले आहे.

प्रभाग २४ : ५३ मतदान केंद्रे असून १४ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होईल.

४. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय (RO-8) : मतमोजणी तपशील

या कार्यालयांतर्गत एकूण पाच प्रभागांचा समावेश आहे.

प्रभाग ३० : ६३ मतदान केंद्रे असून १६ फेऱ्यांत मतमोजणी पार पडेल.

प्रभाग २० : ५९ मतदान केंद्रे असून येथे सर्वाधिक २० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३ मुख्य टेबल्स असतील.

प्रभाग ३१ : ५६ मतदान केंद्रे असून १९ फेऱ्या होतील.

प्रभाग ३२ : ४९ मतदान केंद्रे असून १७ फेऱ्यांत निकाल स्पष्ट (PCMC Vote Counting)होईल.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00