पिंपरी, दि. ३ एप्रिल २०२६ : “लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे. निगडी परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला ऑक्सिजन पार्क हा पर्यावरणपूरक आणि आदर्श उपक्रम आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी (Oxygen Park Nigdi) केले.
निगडी प्राधिकरण सेक्टर २६ येथे स्थानिक नागरिक व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती (Oxygen Park Nigdi)होती.
या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसेविका शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, नगरसेवक अमित गावडे तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदींचा समावेश(Oxygen Park Nigdi) होता.
महापौर रवि लांडगे पुढे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड शहर अधिक आरोग्यदायी व सुंदर बनेल. शहरातील सुमारे २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशाच प्रकारची संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी(Oxygen Park Nigdi) सांगितले.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी (Oxygen Park Nigdi) केले.
कोट
“शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढावे, यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा (Oxygen Park Nigdi) आहे.”
— शर्मिला बाबर, उपमहापौर
कोट
“वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण (Oxygen Park Nigdi) ठरेल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त
