Home माझं पिंपरी चिंचवड Illegal Construction:नवी सांगवीत महापालिकेची मोठी कारवाई; ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

Illegal Construction:नवी सांगवीत महापालिकेची मोठी कारवाई; ३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करत १३० चौरस मीटर क्षेत्रातील ३ आरसीसी बांधकामांचे निष्कासन केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात आज मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर परिसरातील अंदाजे १३० चौरस मीटर क्षेत्रफळावरील तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त करण्यात (Illegal Construction) आली.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच ह क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. कारवाईदरम्यान उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, महापालिका धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १८ जवान उपस्थित (Illegal Construction)होते.

 

तसेच १० मजूर, एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर ब्रेकरच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. कारवाईदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला(Illegal Construction) होता.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले (Illegal Construction) आहे.

 

“नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे. अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला(Illegal Construction) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00