चिंचवड : एम्पायर इस्टेट परिसरातील पादचारी पुलाच्या (फूटओव्हर ब्रिज) पायथ्याजवळ शुक्रवारी (12 जून) सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले (Crime News)आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच या घटनेशी संबंधित काही दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात चर्चांना उधाण आले (Crime News)आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूमागील कारणही स्पष्ट झालेले (Crime News)नाही.
पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे तसेच घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून विविध अंगांनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे एम्पायर इस्टेट परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत(Crime News) आहे.
