पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट–१ पथकाने महिला चेन स्नॅचिंगच्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ३ लाख ४० हजार रुपये(PCMC Police) इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पसार होण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड, पुणे शहर तसेच नाशिक ग्रामीण भागात केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण (PCMC Police) केले.
तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट–१ च्या पथकाने तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी संत तुकाराम नगर आणि चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली(PCMC Police) आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही आरोपींविरोधात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यांत यापूर्वी २५ पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील संत तुकाराम नगर आणि चिखली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हेही या कारवाईत उघडकीस आले (PCMC Police)आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट–१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, प्रमोद वेताळ, तसेच संतोष इंगळे, महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, शेळकंदे, संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, चिखलकर, खेडकर आदी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी(PCMC Police) केली.
