Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेचे स्वतंत्र कार्यालय सुरू

PCMC Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेचे स्वतंत्र कार्यालय सुरू

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन. धीरज पाटील यांची विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती.

by Admin
Spread the love

(पिंपरी, २५ ऑगस्ट ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (२४ ऑगस्ट) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तपदी धीरज पाटील यांची २० ऑगस्ट रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली (PCMC Police ) आहे.

 

उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त चौबे यांनी विशेष शाखेच्या कामकाजाचे महत्त्व अधोरेखित करून कामकाज अधिक गतिमान, कार्यक्षम आणि प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. विशेष शाखेच्या माध्यमातून आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या बाबींवर प्रभावी लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होणार (PCMC Police )आहे.

 

या वेळी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शरदकुमार महावरकर, पोलीस सह आयुक्त डॉ. अशोक थोरात, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. गजानन राठोड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) गणेश इंगळे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) सदाशिव आठले, पोलीस उपआयुक्त (झोन-१) प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त (झोन-२) महेश्वर रेड्डी, पोलीस उपआयुक्त (झोन-३) हेमंत कदम, पोलीस उपआयुक्त (वाहतूक शाखा) सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) रणजीत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सचिन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सुबोध यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त (एमआयडीसी भोसरी विभाग) मनोज शिरोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (सायबर/आर्थिक गुन्हे शाखा) हेमंत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-१ संजय नरवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-२ तसेच विशेष शाखा-१ व २ मधील अधिकारी आणि अंमलदार उपस्थित(PCMC Police ) होते.

 

नव्या स्वतंत्र कार्यालयामुळे विशेष शाखेचे कार्यालयीन कामकाज अधिक प्रभावी आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पोलीस उपआयुक्त धीरज पाटील यांनी (PCMC Police ) सांगितले .


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00