Home पुणे Ghazal Vidha Group:गझल लेखनात तंत्राविषयी निष्णात असणे गरजेचे : प्रा. सिद्धार्थ भगत

Ghazal Vidha Group:गझल लेखनात तंत्राविषयी निष्णात असणे गरजेचे : प्रा. सिद्धार्थ भगत

गझलविधा समूहाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. सिद्धार्थ भगत यांना गझल साफल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गझल लेखनातील तंत्राचे महत्त्व त्यांनी विशद केले.

by Admin
Spread the love

(पुणे, प्रतिनिधी ): गझल लेखनाचे तंत्र हे बाह्य आवरण असले, तरी ते किती कौशल्याने सांभाळायचे आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा, हे समजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गझलकाराने तंत्राच्या बाबतीत निष्णात असणे गरजेचे आहे. हे तंत्र अवगत झाल्यानंतर मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त किंवा लयबद्धतेत गझल लिहिता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत यांनी (Ghazal Vidha Group)केले.

 

गझलविधा समूहातर्फे आयोजित गझलविधा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रा. सिद्धार्थ भगत यांना ‘गझल साफल्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत(Ghazal Vidha Group) होते.

 

नचिकेत जोशी यांना ‘शुभ्र मनाचा कागद’ या गझलसंग्रहासाठी ‘गझल बहर पुरस्कार’, तर जयश्री कुलकर्णी यांना गझल लेखनासाठी ‘गझल पालवी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. समीक्षक संजय गोरडे यांचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात (Ghazal Vidha Group) आला.

 

या वेळी गझलविधा समूहाचे प्रमुख प्रशासक भूषण कटककर, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे आणि डॉ. शिवाजी काळे उपस्थित (Ghazal Vidha Group)होते.

 

प्रा. भगत म्हणाले, “लेखनामध्ये मी कुणाला गुरू केलेले नाही आणि माझा कुणी चेलाही नाही.” गझलकार सुरेश भट यांच्या गझला वाचून आपण प्रभावित झालो आणि त्यातूनच गझल लेखनाकडे वळलो, असे त्यांनी (Ghazal Vidha Group)सांगितले.

 

पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करताना प्रमोद खराडे म्हणाले, कादंबरीचा विस्तृत आशय दोन ओळींच्या गझलेतूनही प्रभावीपणे सादर करता येतो. पुरस्कार देणारी संस्था, तिचे कार्य आणि त्या कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व यामुळे पुरस्काराची उंची (Ghazal Vidha Group)वाढते.

 

गझलसंग्रहाच्या छपाईचे आजच्या काळातील महत्त्व विशद करताना डॉ. शिवाजी काळे म्हणाले, छापील साहित्यकृतीच्या माध्यमातून साहित्यिक पिढ्यान्‌पिढ्या जिवंत राहतो. लेखक लिहिण्याचा कंटाळा करतो, त्यामुळे वाचकसंख्या कमी होत आहे. समाजमाध्यमांवर लिहिले जाणारे साहित्य वाचकाच्या अंतर्मनात पुरेसे मुरत नाही आणि त्यामुळे त्यावर अपेक्षित चिंतनही होत (Ghazal Vidha Group) नाही.

 

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. कैलास गायकवाड म्हणाले, गझलेच्या धाग्याने गझलविधा समूह जोडला गेला आहे. गझल हे सभ्यपणे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम (Ghazal Vidha Group) आहे.

 

जयश्री कुलकर्णी, समीक्षक डॉ. स्नेहल कुलकर्णी आणि संजय गोरडे यांनीही मनोगत व्यक्त केले. वैजयंती आपटे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. अमिता पेठे-पैठणकर, प्राजक्ता वेदपाठक आणि जनार्दन म्हात्रे यांनी मानपत्रांचे वाचन केले. वैशाली माळी यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबळे यांनी आभार मानले, तर प्राजक्ता पटवर्धन यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन (Ghazal Vidha Group) केले.

 

फोटो ओळ : गझलविधा समूह आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शिवाजी काळे, डॉ. कैलास गायकवाड, नचिकेत जोशी, प्रा. सिद्धार्थ भगत, जयश्री कुलकर्णी, संजय गोरडे, प्रमोद खराडे, भूषण कटककर आणि जनार्दन म्हात्रे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00