Home प्रेरणा / यशकथा Narayan Surve Poetry:सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व : डॉ. श्रीपाल सबनीस

Narayan Surve Poetry:सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व : डॉ. श्रीपाल सबनीस

पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त भोसरीत काव्यजागर व सन्मान सोहळा संपन्न. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सुर्वे यांच्या कवितेचा गौरव केला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, २० ऑगस्ट ): “कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय,” असे गौरवोद्गार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Narayan Surve Poetry) काढले .

 

पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने भोसरी येथे आयोजित काव्यजागर व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रगती प्रेस टूल्स इंडिया प्रा. लि. यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे प्रगतशील उद्योग पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संचालक लक्ष्मण काळे व राम काळे यांनी पुरस्कार(Narayan Surve Poetry) स्वीकारला.

 

यावेळी टाटा मोटर्स ग्रामविकासाचे प्रणेते मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती(Narayan Surve Poetry) होती.

 

अनुराधा गोरखे यांना ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान’, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’, महेंद्र भारती यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार’ आणि कवी कुमार खोंद्रे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान’ देऊन गौरविण्यात (Narayan Surve Poetry) आले.

 

सबनीस म्हणाले, “केशवसुत, मर्ढेकर आणि सुर्वे हे मराठी कवितेतील तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. सुर्वे यांनी आपल्या अज्ञात आईविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि मातृत्वाचा सन्मान अद्वितीय आहे. त्यांची कविता ही सर्वसामान्य माणसांसाठीची कविता(Narayan Surve Poetry) आहे.”

 

सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत उद्योग उभारण्याचा प्रवास सांगत “प्रगती टूल्स म्हणजे एक कुटुंब आहे,” अशी भावना व्यक्त केली. अनुराधा गोरखे यांनी कष्ट आणि संस्कारांमुळे जीवनाला मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुनील महाजन यांनी सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त (Narayan Surve Poetry) केला.

 

मनोहर पारळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून संस्कारक्षम पिढी घडविण्यात आईची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. सुदाम भोरे यांनी सुर्वे हे कष्टकरी समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद (Narayan Surve Poetry) केले.

 

काव्यजागरमध्ये राजेंद्र वाघ, रजनी कानडे, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे आणि स्वाती भोसले यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. कुमार खोंद्रे यांनी स्वरचित पिंपरी-चिंचवडची लावणी सादर करून रसिकांची दाद(Narayan Surve Poetry) मिळवली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे निवेदन, तर प्रदीप गांधलीकर यांनी आभार(Narayan Surve Poetry) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00