(पिंपरी) : पिंपरीगावातील ज्येष्ठ विधिज्ञ राजाभाऊ ऊर्फ मारुती कृष्णा सूर्यवंशी (वय ७६) यांचे मंगळवारी (दि. १८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना व नातवंडे असा परिवार (Ad. Rajabhau Suryavanshi) आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी हे त्यांचे मूळ गाव. सूर्यवंशी यांनी सुरुवातीला बी.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात काही काळ नोकरी केली. त्यानंतर एलएलबी करून त्यांनी तब्बल ४२ वर्षे वकिली क्षेत्रात सेवा (Ad. Rajabhau Suryavanshi)बजावली.
समाजातील गरजूंना सातत्याने मदत करणारे व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी ४४ वर्षे नरसिंहवाडी येथे श्री दत्त पादुका दर्शनाची वारी केली. तसेच धनकवडी येथील श्री शंकर महाराज मठ ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणूनही त्यांनी सेवा (Ad. Rajabhau Suryavanshi)केली.
