Home माझं पिंपरी चिंचवड Chinchwad Industrial Area:पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रश्नांवर संयुक्त समिती; उदय सामंतांचे निर्देश

Chinchwad Industrial Area:पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रश्नांवर संयुक्त समिती; उदय सामंतांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेतील संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात येणार असून, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी (Chinchwad Industrial Area)दिली.

 

औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, कायमस्वरूपी पोलीस गस्ती पथक सुरू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. सन २०१३ मध्ये संघटनेने प्रायोगिक तत्त्वावर गस्ती पथकाची योजना राबविली होती. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र, आर्थिक कारणांमुळे ही योजना बंद करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत उद्योजकांना स्वतंत्रपणे गस्ती पथक चालविणे शक्य नसल्याने पोलीस ठाण्यामार्फत ही व्यवस्था कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी करण्यात आली(Chinchwad Industrial Area) आहे.

 

सेक्टर ७ व १० मधील फॅसिलिटी सेंटरचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या औद्योगिक परिसरात गेल्या सुमारे २० वर्षांपासून फॅसिलिटी सेंटरसाठी जागा राखीव आहे. मात्र, अद्याप या जागेवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे फॅसिलिटी सेंटरचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली(Chinchwad Industrial Area) आहे.

 

पीएमआरडीएकडून भूखंड हस्तांतरणासाठी आकारण्यात येणारे ट्रान्सफर चार्जेस सध्याच्या रेडी रेकनर दरानुसार असल्याने ते उद्योजकांसाठी मोठे आर्थिक ओझे ठरत आहेत. हे शुल्क एमआयडीसीच्या प्रचलित दरानुसार आकारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली (Chinchwad Industrial Area)आहे.

 

तसेच, सेक्टर ७ व १० मध्ये फॅसिलिटी सेंटरसाठी राखीव असलेल्या जागेतून महावितरणच्या सबस्टेशनसाठी प्रत्येकी १,००० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार (Chinchwad Industrial Area)आहे.

 

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासासाठी या सर्व प्रश्नांवर संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. संयुक्त समितीच्या माध्यमातून प्रश्नांची विभागनिहाय सोडवणूक करून त्यावर कालबद्ध कार्यवाही होईल, अशी अपेक्षा संदीप बेलसरे यांनी व्यक्त (Chinchwad Industrial Area)केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00