पिंपरी, दि. ३० : महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. विशेष म्हणजे राजन लाखे यांच्यासह १५ सदस्यांची संपूर्ण पंचवार्षिक कार्यकारिणीही बिनविरोध निवडण्यात (MASAP Pimpri)आली.
चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयात शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन हे केंद्र निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार (MASAP Pimpri)पडली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १५ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी तीन, तर कार्यवाहपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपाध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. डॉ. सुभाष आहेर आणि कार्यवाहपदाचे उमेदवार प्रा. नरहरी वाघ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन(MASAP Pimpri) केले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला १६४ सभासद उपस्थित होते.
नूतन पंचवार्षिक कार्यकारिणी
अध्यक्ष : राजन लाखे
उपाध्यक्ष : डॉ. रजनी शेठ, मकरंद बापट
कार्यवाह : संजय जगताप, गीता सुतार
कोषाध्यक्ष : विजय नाईक
कार्यकारिणी सदस्य : किरण लाखे, दत्तू ठोकळे, डॉ. मीनल लाड, किरण जोशी, नीलिमा फाटक, इला पवार, बाळासाहेब गोरे, अशोक होनराव आणि संजय होनकळस.
आगामी शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जोमाने काम करण्याचे आवाहन
सभेला संबोधित करताना मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी आगामी ऐतिहासिक शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारिणीने जोमाने काम करून पिंपरी-चिंचवड शाखेचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत करावा, असा विश्वास व्यक्त(MASAP Pimpri) केला.
निवडणूक प्रक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मसाप सदस्य नितीन शास्त्री, डॉ. मीनल लाड, श्रीकृष्ण पुरंदरे, संदीप राक्षे आणि अद्वैत ऐनापुरे यांनी पिंपरी-चिंचवड शाखेने सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक(MASAP Pimpri) केले.
डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच सर्व उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेचा आदर राखून दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त (MASAP Pimpri)केले.
अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर राजन लाखे यांनी सर्व सभासदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले तसेच आभार (MASAP Pimpri)मानले.
