Home क्रीडा FF E Sports 2026:Latin America च्या LYON ने जिंकला Free Fire Esports World Cup 2026; भारतीय Team Apex Gaming बाराव्या, S8UL अकराव्या स्थानावर

FF E Sports 2026:Latin America च्या LYON ने जिंकला Free Fire Esports World Cup 2026; भारतीय Team Apex Gaming बाराव्या, S8UL अकराव्या स्थानावर

Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेत Latin America च्या LYON संघाने विजेतेपद पटकावले. LOUD Snickers उपविजेता ठरला, AG.AL तिसऱ्या स्थानावर राहिला. भारताच्या S8UL ने 11 वे तर Team Apex Gaming ने 12 वे स्थान मिळवले.

by Admin
Spread the love

पॅरिस (फ्रान्स), दि. १८ : जगभरातील अव्वल Free Fire संघांच्या उपस्थितीत पार पडलेल्या Free Fire Esports World Cup (EWC) 2026 स्पर्धेत Latin America प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या LYON संघाने शानदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले. विजेतेपदासह LYON संघाने प्रतिष्ठेची EWC ट्रॉफी उंचावत 3 लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ₹2.5 कोटी) इतकी बक्षीस रक्कम आपल्या नावे केली. LYON हा मेक्सिकोस्थित ई-स्पोर्ट्स संघ असून त्याच्या रोस्टरमध्ये चिली, अर्जेंटिना आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांतील खेळाडूंचा समावेश (FF E Sports 2026) आहे.

 

स्पर्धेत ब्राझीलच्या LOUD Snickers संघाने दमदार खेळ करत उपविजेतेपद पटकावले, तर AG.AL संघाने तिसरे स्थान मिळवले. अंतिम फेरीत सर्वच संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना उच्च दर्जाच्या ई-स्पोर्ट्सचा रोमांच अनुभवायला (FF E Sports 2026)मिळाला.

 

भारतीय चाहत्यांसाठी यंदाच्या स्पर्धेत S8UL Esports आणि Team Apex Gaming या दोन संघांनी विशेष आकर्षण ठरले. दोन्ही संघांनी ग्रुप स्टेजनंतर सर्व्हायव्हल स्टेजमध्ये उत्कृष्ट खेळ करत ग्रँड फायनलमध्ये स्थान मिळवले होते. विशेषतः Team Apex Gaming ने सर्व्हायव्हल स्टेजमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरी गाठल्याने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या (FF E Sports 2026) होत्या.

 

मात्र ग्रँड फायनलमध्ये जागतिक दर्जाच्या बलाढ्य संघांविरुद्ध भारतीय संघांना अपेक्षित सातत्य राखता आले नाही. S8UL Esports ने 40 गुणांसह 11 वे स्थान, तर भारतीय खेळाडू मानवचा समावेश असलेल्या Team Apex Gaming ने 28 गुणांसह 12 वे स्थान मिळवत स्पर्धेतील आपला प्रवास (FF E Sports 2026) संपवला.

 

यंदाच्या Esports World Cup मध्ये जगभरातील 24 अव्वल संघांनी सहभाग घेतला होता. ग्रुप स्टेज, सर्व्हायव्हल स्टेज आणि ग्रँड फायनल अशा तीन टप्प्यांत झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघांनी जागतिक स्तरावर आपली स्पर्धात्मक क्षमता दाखवून दिली. विजेतेपद जरी हुकले असले, तरी ग्रँड फायनलपर्यंत मजल मारत भारतीय संघांनी आंतरराष्ट्रीय Free Fire ई-स्पोर्ट्समध्ये आपली मजबूत उपस्थिती पुन्हा एकदा सिद्ध (FF E Sports 2026)केली.

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00