Home माझं पिंपरी चिंचवड Sonam Wangchuk Protest:पिंपरीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘जवाब दो’ आंदोलन; नीट परीक्षा प्रकरणी चौकशीची मागणी

Sonam Wangchuk Protest:पिंपरीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ‘जवाब दो’ आंदोलन; नीट परीक्षा प्रकरणी चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवडमध्ये अपना वतन संघटना व समविचारी संघटनांच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षा प्रकरणाची चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १८ : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली येथे शिक्षणतज्ज्ञ व वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत अपना वतन संघटना आणि शहरातील समविचारी संघटनांच्या वतीने शनिवारी ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात(Sonam Wangchuk Protest) आले.

सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक मानवजी कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रवीण कदम, रोहिणी कांबळे, अंजुम इनामदार, रवी यादव, राजन नायर, ब्रह्मानंद जाधव, प्रदीप पवार, गणेश दराडे, सालार शेख, फेरोज तांबोळी, राजू सरोदे, प्रकाश घोडके, प्रमोद शिंदे आदी सहभागी (Sonam Wangchuk Protest) झाले.

यावेळी मानवजी कांबळे यांनी सोनम वांगचुक यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. मारुती भापकर यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. सिद्दीकभाई शेख यांनी सोनम वांगचुक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तसेच आंदोलकांशी संवाद न साधल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात(Sonam Wangchuk Protest) आला.

आंदोलनास अपना वतन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित (Sonam Wangchuk Protest) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00