Home माझं पिंपरी चिंचवड PCMC New Logo:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा

PCMC New Logo:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी. बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा आणि ‘कटिबद्ध जनहिताय’ ब्रीदवाक्याचा समावेश

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा आणि ‘कटिबद्ध जनहिताय’ हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या बोधचिन्हाच्या अंतिम नमुन्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी संबंधित ठरावास मान्यता (PCMC New Logo)दिली.

महापालिकेच्या प्रशासकीय ठरावानुसार, नवीन म्युरल आणि बोधचिन्हाचा अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आणि रयतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून या बोधचिन्हाची रचना करण्यात आली आहे. ‘कटिबद्ध जनहिताय’ हे ब्रीदवाक्य महापालिकेची जनतेप्रती असलेली प्रशासकीय व सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणार (PCMC New Logo)आहे.

नवीन बोधचिन्हाचा अंतिम नमुना मंजूर झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध प्रभाग आणि विभागांच्या शासकीय इमारतींच्या दर्शनी भागावर हे बोधचिन्ह लावण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक आकारमान आणि तांत्रिक निकष निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार (PCMC New Logo)आहे.

या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून त्यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले (PCMC New Logo) आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00