Home क्रीडा Interschool Shooting Competition:आंतरशालेय रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत ४३ शाळांचा सहभाग

Interschool Shooting Competition:आंतरशालेय रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत ४३ शाळांचा सहभाग

कारगिल विजय दिनानिमित्त चिंचवडमध्ये आयोजित आंतरशालेय रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील ४३ शाळांमधील १२५ नेमबाजांचा सहभाग.

by Admin
Spread the love

चिंचवड, दि. १३ : कारगिल विजय दिनानिमित्त प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि डायनॅमिक युथ स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात (Interschool Shooting Competition)आले.

स्पर्धेचे उद्घाटन सुभेदार मेजर कॅप्टन भाऊसाहेब तांबे आणि सुभेदार मेजर कॅप्टन संताजी घार्गे यांच्या हस्ते झाले. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत शालेय स्तरावर नेमबाजीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक (Interschool Shooting Competition) केले.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, बारामतीसह जिल्ह्यातील ४३ शाळांमधील १२५ नेमबाजांनी स्पर्धेत सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्षांखालील, ओपन आणि पॅरा अशा विविध गटांत रायफल (ओपन साईट व पीप साईट) आणि पिस्तूल शूटिंग प्रकारात खेळाडूंनी कौशल्याचे प्रदर्शन (Interschool Shooting Competition) केले.

स्पर्धेस कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका वृंदा मुलतानी-जोशी, उपमुख्याध्यापिका लिझा सोजू आणि शालेय समन्वयक गुलनाज खान यांनी सहकार्य (Interschool Shooting Competition)केले.

डायनॅमिक युथ स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक-संचालक रमेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा यशस्वीपणे पार (Interschool Shooting Competition)पडली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00