Home मनोरंजन Jubilee Star Rajendrakumar:चला चला जाऊ सिनेमाला” ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या सिनेमा कारकीर्दीचा आढावा (भाग – २)

Jubilee Star Rajendrakumar:चला चला जाऊ सिनेमाला” ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या सिनेमा कारकीर्दीचा आढावा (भाग – २)

ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा, अजरामर गीतांचा आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सुवर्ण कारकिर्दीचा सविस्तर आढावा. 'सूरज', 'आरजू', 'संगम', 'ससुराल' ते 'लव्ह स्टोरी'पर्यंतचा संगीतमय प्रवास.

by Admin
Spread the love

(सुरेश कंक )एका मागोमाग एक चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरवत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्युबिली स्टार म्हणून ओळख निर्माण करणारे राजेंद्रकुमार हे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या चित्रपटांची दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची परंपराच होती. “धूल का फूल”, “आयी मिलन की बेला” यांसारखे चित्रपट ‘खास दिवाळी आकर्षण’ म्हणून प्रदर्शित होत आणि प्रेक्षक त्यांची आतुरतेने वाट पाहत (Jubilee Star Rajendrakumar)असत.

 

“धूल का फूल” या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले—

 

“तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा…”

 

हे गीत आजही सर्वधर्मसमभावाचा संदेश देत राहिले (Jubilee Star Rajendrakumar)आहे.

 

ससुराल”मधील गाण्यांची जादू

 

“ससुराल” चित्रपटातील कॉलेजमधील गायनस्पर्धेवर चित्रित झालेले—

 

“एक सवाल मैं करूँ, एक सवाल तुम करो…”

 

हे राजेंद्रकुमार आणि बी. सरोजा देवी यांच्यावर चित्रित झालेले गीत त्या काळात प्रचंड लोकप्रिय (Jubilee Star Rajendrakumar)झाले.

 

आयी मिलन की बेला” आणि धर्मेंद्रचा प्रवास

 

या चित्रपटात राजेंद्रकुमार, धर्मेंद्र आणि सायरा बानू ही तगडी स्टारकास्ट होती. धर्मेंद्र यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीला या चित्रपटाने मोठी चालना दिली. राजेंद्रकुमार आणि धर्मेंद्र यांची मैत्रीही चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय (Jubilee Star Rajendrakumar)होती.

 

“आहा! आई मिलन की बेला…” आणि

“तुम कमसिन हो, नादान हो…”

 

ही दोन्ही गाणी रसिकांच्या ओठांवर रेंगाळत (Jubilee Star Rajendrakumar)राहिली.

 

रंगीत चित्रपटांचा नवा काळ

 

१९६५ नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत कृष्णधवल चित्रपटांची जागा रंगीत चित्रपटांनी घेतली. टेक्निकलर, इस्टमनकलर अशा रंगीत चित्रपटांचे प्रेक्षकांना विलक्षण आकर्षण होते.राज कपूर दिग्दर्शित “संगम” (१९६४) हा टेक्निकलर चित्रपट याच परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील—

 

“ये मेरा प्रेमपत्र पढ़कर…”

 

या गीताने तरुणाईला अक्षरशः वेड लावले. त्या काळी प्रेम व्यक्त करण्याचे साधन म्हणजे प्रेमपत्र; त्यामुळे हे गाणे प्रत्येक प्रेमिकाच्या मनात घर करून (Jubilee Star Rajendrakumar)राहिले.

 

आरजू”ची लोकप्रियता

 

१९६५ मध्ये साधना आणि राजेंद्रकुमार यांचा “आरजू” प्रदर्शित झाला. त्याच काळात शशी कपूर आणि नंदा यांचा “जब जब फूल खिले” देखील प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपटांमध्ये जणू स्पर्धाच रंगली.

“जब जब फूल खिले” अधिक यशस्वी ठरला, तरी रामानंद सागर दिग्दर्शित “आरजू” कुठेही कमी पडला (Jubilee Star Rajendrakumar)नाही .

 

मोहम्मद रफी यांच्या आवाजातील—

 

“ए नर्गिस-ए-मस्ताना…”

“ये फूलों की रानी…”

 

या गीतांनी लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले.

 

सूरज” आणि अमर झालेले गीत

 

राजेंद्रकुमार यांच्या कारकिर्दीला सर्वोच्च शिखरावर नेणारा चित्रपट म्हणजे “सूरज”.

 

आजही लग्नसोहळ्यांमध्ये वधू-वरांच्या स्वागतावेळी हमखास वाजणारे—

 

“बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है…”

 

हे गीत अजरामर ठरले. हसरत जयपुरी यांचे शब्द आणि शंकर-जयकिशन यांचे संगीत यामुळे या गीताला अमाप लोकप्रियता (Jubilee Star Rajendrakumar)मिळाली.

 

बिनाका गीतमालेतील सुवर्णक्षण

 

रेडिओ सिलोनवरील अमीन सयानी यांच्या आवाजातील “बिनाका गीतमाला” हा कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी पर्वणी असायचा.

 

राजेंद्रकुमार यांची तीन गाणी वर्षातील सर्वोत्तम गीतांमध्ये झळकली—

 

• तेरी प्यारी प्यारी सूरत को… (ससुराल – १९६१)

• मुझको अपने गले लगा लो… (हमराही – १९६३)

• बहारों फूल बरसाओ… (सूरज – १९६६)

 

“झुक गया आसमान” ते “तलाश”

 

“झुक गया आसमान”मध्ये पुन्हा एकदा सायरा बानू आणि राजेंद्रकुमार यांची जोडी प्रेक्षकांना भावली.

 

“कौन है जो सपनों में आया…”

 

हे गीत आजही तितकेच मधुर वाटते.

 

ओ. पी. रल्हन निर्मित “तलाश” या भव्य चित्रपटातील—

 

“आज को जुनली रात माँ…”

 

हे गीतही रसिकांच्या मनात कायमचे कोरले(Jubilee Star Rajendrakumar) गेले.

 

इतर संस्मरणीय चित्रपट

 

“गूंज उठी शहनाई” मधील—

 

“जीवन में पिया तेरा साथ रहे…”

 

हे वसंत देसाई यांच्या संगीताने सजलेले गीत आजही तितकेच भावते.

 

स्वतः निर्मित “गँवार” चित्रपटातील—

 

“दुनिया हँसे, हँसती रहे…”

 

तर “अंजाना” मधील—

 

“जान चली जाए…”

 

ही गाणीही लोकप्रिय ठरली.

 

“साथी” चित्रपटातील—

 

“मेरा प्यार भी तू है…”

 

आणि

 

“हुस्न-ए-जाना इधर आ…”

 

या गीतांनी भावनांचा उत्कट आविष्कार घडविला.

 

मैत्री, नाती आणि अभिनय

 

राज कपूर यांच्या “मेरा नाम जोकर”मध्ये मित्रत्वाच्या नात्याला न्याय देत राजेंद्रकुमार यांनी भूमिका साकारली.

 

रामानंद सागर यांच्या “गीत” चित्रपटातील—

 

“आजा तुझको पुकारे मेरे गीत रे…”

 

हे गीत आजही मनाला स्पर्श करते.

 

“धरती” चित्रपटातील—

 

“खुदा भी आसमान से…”

 

हे प्रेमगीतदेखील रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले.

 

प्रदीर्घ कारकीर्द

 

“अमन”, “शतरंज”, “गोरा और काला”, “आप आये बहार आयी”, “ललकार”, “साजन बिना सुहागन”, “दो जासूस”, “साजन की सहेली”, “गाव हमारा शहर तुम्हारा”, “तांगेवाला”, “सुनहरा संसार”, “शिर्डी के साई बाबा” अशा अनेक चित्रपटांतून राजेंद्रकुमार यांनी आपल्या अभिनयाचा ठसा (Jubilee Star Rajendrakumar)उमटवला.

 

निर्माता म्हणूनही यश

 

मुलगा कुमार गौरव याला लाँच करण्यासाठी त्यांनी “लव्ह स्टोरी”ची निर्मिती केली. चित्रपट सुपरहिट ठरला. आर. डी. बर्मन यांच्या संगीताने सजलेली—

 

“देखो मैंने देखा है एक सपना…”

 

यासह सर्वच गाणी लोकप्रिय झाली. मात्र कुमार गौरवला वडिलांइतके यश मिळू शकले (Jubilee Star Rajendrakumar)नाही.

 

अखेर…

 

राजेंद्रकुमार हे केवळ यशस्वी अभिनेते नव्हते, तर दूरदृष्टी असलेले व्यावसायिकही होते. अभिनयातून मिळालेल्या कमाईचे त्यांनी योग्य नियोजन केले.आजही त्यांचा अभिनय आणि त्यांच्या चित्रपटांतील अजरामर गीते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत (Jubilee Star Rajendrakumar)आहेत.

 

पावसाळा सुरू झाला की नकळत त्यांच्या एका गाण्याची आठवण जागी होते—

 

“रिमझिम के गीत सावन गाए…”

 

आणि मन पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळात हरवून (Jubilee Star Rajendrakumar)जाते.

 

सुरेश कंक

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00