Home क्रीडा Vaibhav Suryavanshi Debut :वैभव सूर्यवंशीचे विक्रमी पदार्पण; भारताचा पराभव, पण क्रिकेटला मिळाला नवा युवा तारा

Vaibhav Suryavanshi Debut :वैभव सूर्यवंशीचे विक्रमी पदार्पण; भारताचा पराभव, पण क्रिकेटला मिळाला नवा युवा तारा

अवघ्या १५ वर्षे ९९ दिवसांचा वैभव सूर्यवंशी भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. इंग्लंडविरुद्ध पदार्पणात विक्रम, पण भारताला पराभव.

by Admin
Spread the love

(लंडन | ४ जुलै २०२६):ज्या क्षणाची भारतीय क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला. अवघ्या १५ वर्षे ९९ दिवस वयात वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा मान पटकावला. या कामगिरीसह त्याने तब्बल ३७ वर्षे जुना सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मागे (Vaibhav Suryavanshi Debut )टाकला.

 

विक्रमी पदार्पणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वैभवकडे लागले होते. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अभिषेक शर्मासोबत वैभवने डावाची सुरुवात केली. दोघांनी अवघ्या चार षटकांत ५० धावांची झंझावाती भागीदारी करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली. वैभवने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मारलेला उत्तुंग षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला. मात्र त्याची खेळी केवळ १४ धावांवर संपुष्टात(Vaibhav Suryavanshi Debut ) आली.

 

त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चांगली सुरुवात मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यात अपयशी ठरले. कर्णधार श्रेयस अय्यरलाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारताने २० षटकांत १९० धावा (Vaibhav Suryavanshi Debut )उभारल्या.

 

१९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दोन धक्के देत इंग्लंडला हादरवून सोडले. त्यानंतर हॅरी ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. मात्र अक्षर पटेल याने त्याला बाद करत आपल्या टी-२० कारकिर्दीतील १०० वी विकेट पूर्ण (Vaibhav Suryavanshi Debut )केली.

 

सामना भारताच्या बाजूने झुकत असल्याचे वाटत असतानाच जेकब बेथेल आणि टॉम बॅन्टन यांनी शानदार भागीदारी रचत इंग्लंडला पुन्हा सामन्यात आणले. निर्णायक क्षणी रवी बिश्नोईच्या एका षटकात तब्बल २८ धावा वसूल करत बेथेलने सामन्याचे चित्रच पालटले. बिश्नोईचा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. त्याने चार षटकांत ६० धावा खर्च करत इंग्लंडचा विजय सोपा (Vaibhav Suryavanshi Debut )केला.

 

या पराभवासह श्रेयस अय्यरच्या भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची सुरुवातही निराशाजनक ठरली. आयपीएलमध्ये यशस्वी नेतृत्व करणाऱ्या अय्यरला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विजयाची नांदी मिळवण्यासाठी पुढील सामन्यांत अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार (Vaibhav Suryavanshi Debut ) आहे.

 

भारतीय संघाला विजय मिळवता आला नसला, तरी वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक पदार्पणाने भारतीय क्रिकेटला भविष्यातील एक नवा सुपरस्टार मिळाल्याची आशा निश्चितच बळावली (Vaibhav Suryavanshi Debut ) आहे.

Screenshot

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00