पर्थ – एशेज मालिकेच्या पहिल्या कसोटीला आज पर्थमध्ये रंगतदार सुरुवात झाली. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेतली, मात्र मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाज टिकू शकले नाहीत. इंग्लंडची पहिली खेळी अवघ्या 33 षटकांत 172 धावांत गडगडली. स्टार्कने एकहाती 7 विकेट घेत इंग्लिश डाव उधळून लावला, तर पदार्पण करणाऱ्या ब्रेंडन डॉगेटने 2 विकेट घेत साथ( Ashes 2025) दिली.
इंग्लंडची दयनीय सुरुवात
पहिल्याच षटकात स्टार्कने जॅक क्रॉलीला शून्यावर माघारी पाठवले. नंतर बेन डकेट (21) आणि जो रूट (0) यांनाही स्टार्कने तंबू दाखवला. काहीशी बचावात्मक भागीदारी ब्रूक–पोप जोडीकडून दिसली. ब्रूकने अर्धशतक (52) झळकावले, तर पोप 46 धावांवर बाद झाला. शेवटच्या फळीने मात्र हात टेकले, आणि इंग्लंडचा डाव 172 वर ( Ashes 2025)आटोपला.
ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात
जवाबात ऑस्ट्रेलियाचीही सुरुवात हादरवणारीच ठरली. डेब्यूटंट जेक वेदराल्ड शून्यावर बाद, तर मार्नस लाबुशेनलाही (9) जोफ्रा आर्चरने बोल्ड करून तंबू दाखवला. स्टीव्ह स्मिथ (17), ख्वाजा (2), हेड (21) आणि ग्रीन (24) हेही स्वस्तात ( Ashes 2025) बाद झाले.
ऑस्ट्रेलिया दिवसाअखेर 123/9 वर संघर्ष करत असून इंग्लंडपेक्षा 49 धावांनी मागे आहे. क्रीजवर नाथन लायन आणि ( Ashes 2025)ब्रेंडन डॉगेट आहेत.
स्टोक्सचा कमालीचा मारा
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स चमकला. त्याने 5 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाची मुळाक्षरे उपटली. ब्राइडन कार्सनेही स्मिथ आणि ख्वाजाचे महत्त्वाचे ( Ashes 2025)बळी घेतले.
ऑस्ट्रेलियासाठी दुहेरी डेब्यू
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून जेक वेदराल्ड आणि ब्रेंडन डॉगेट यांनी पदार्पण केले. डेविड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ख्वाजासोबत सलामीला उतरणारा हा त्यांचा सहावा ( Ashes 2025) साथीदार आहे.
विवेक कुलकर्णी
