Home माझं पिंपरी चिंचवड BJP Pimpri Chinchwad:मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’; २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार

BJP Pimpri Chinchwad:मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’; २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार

पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम राबविण्यात येणार असून दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी 15 सप्टेंबर 2026): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील दोन लाखांहून अधिक नागरिक हातात दिवे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देणार असल्याची माहिती भाजपच्या वतीने देण्यात (BJP Pimpri Chinchwad) आली.

 

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने संपूर्ण महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आशीर्वादाचा दिवा, रोजगार मेळावे, रक्तदान व आरोग्य शिबिरे, ‘स्वप्नाचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, विकासकामांच्या रील स्पर्धा, ‘सेवादीप यात्रा’, ‘सेवा व आपले योगदान’, ‘सेवा सेतू अभियान’, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज आणि ‘जनसेवेचा महाकुंभ’ अशा विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले(BJP Pimpri Chinchwad) आहे.

 

१७ सप्टेंबर रोजी शहरातील भाजपचे आमदार, खासदार, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या सहभागातून ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन हा उपक्रम रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात आले (BJP Pimpri Chinchwad)आहे.

 

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे ‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानाचे शहर संयोजक आहेत. शहर प्रभारी भरत नाना पाटील, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, सेवा संकल्प अभियानाचे प्रमुख व महामंत्री मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडे, महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी यांच्यासह विविध आघाड्या, मोर्चे, प्रकोष्ठांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार (BJP Pimpri Chinchwad) आहेत.

 

अभियानाच्या नियोजनासाठी विधानसभा समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी जोशना कलाटे, भरत ठाकूर व स्वाती जाधव; भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी गीता महेंदू, गायत्री तळेकर व चित्रा अभंग; तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी महेंद्र बाविस्कर, अनघा रुद्र व राखी अर्जुन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली (BJP Pimpri Chinchwad) आहे.

 

तसेच शहरातील विविध मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, हर्षद नढे, सनी बारणे, सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, शिवराज लांडगे, प्रमोद परदेशी, अजय साने, रामदास कुटे, अजित बुर्डे, अनिता वाळुंजकर, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, धरम वाघमारे आदी पदाधिकारी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणार (BJP Pimpri Chinchwad) आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी आपल्या हातात दिवा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले (BJP Pimpri Chinchwad) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00