प्रतिनिधी :महावितरणच्या पिंपरी विभागांतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये गुरुवारी (३० एप्रिल) तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी नियोजित वीज कपात करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत वीज पुरवठा बंद राहणार असून, नागरिकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले (Power Cut)आहे.
उन्हाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर वाघेरे फिडर, जाधवकर वस्ती फिडर, पिंपरी फिडर, श्रीनगर फिडर, गणेशम फिडर आणि मिरास पार्क फिडर अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे. यामध्ये अनेक गृहनिर्माण सोसायट्या, प्रमुख रस्ते तसेच व्यापारी संकुलांचा समावेश (Power Cut)आहे.
ऐन उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत वीज बंद राहणार असल्याने नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना महावितरणच्या पिंपरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली (Power Cut)आहे.
