Home पुणे PCMC Election: तळवडे मतदारयादीत मोठा घोळ, 1261 मतदार चिखलीत

PCMC Election: तळवडे मतदारयादीत मोठा घोळ, 1261 मतदार चिखलीत

PCMC निवडणुकीत तळवडे प्रभागातील 1261 मतदारांची नावे चुकून चिखलीत टाकली. माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचेही नाव गायब. नागरिक आक्षेपार्ह तपास मागणी.

by Admin
Spread the love

/प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या नव्या मतदार यादीत तळवडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोठा घोळ उघड झाला आहे. तब्बल 1261 मतदारांची नावे चुकीने चिखली प्रभागात टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे तळवडे प्रभागातील माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख चेहरे पंकज भालेकर यांच्या घरातील मतदारयादीतून त्यांचे नावही चिखलीत वर्ग झाल्याचे समोर आले आहे.

 

ही धक्कादायक चूक उघडकीस आल्यानंतर तळवडेकर नागरिक आणि भालेकर यांचे समर्थक यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळवडे प्रभागातील भाग क्रमांक 7 मधील सर्व 1261 मतदार एका झटक्यात चिखली प्रभाग 1 मध्ये हलवण्यात आले आहेत. या मोठ्या स्थलांतरामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली ही चूक केवळ तांत्रिक असल्याचे मानणे कठीण आहे. काही नागरिकांचा संशय आहे की यात राजकीय हेतू असण्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वाढत आहे. रेडझोन मर्यादांमुळे अडथळे येत असतानाही तळवडे प्रभागात विकासकामे आणण्यासाठी पंकज भालेकर सतत प्रयत्नशील होते. अशावेळी त्यांच्या नावाचेच गायब होणे किंवा दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित होणे नागरिकांना संशयास्पद वाटत आहे.

 

तळवडे प्रभागापुरतेच नव्हे, तर पिंपरी चिंचवडमधील इतर 32 प्रभागांतही अशाच प्रकारचे मतदार स्थलांतराचे प्रकार दिसत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात या मुद्द्याची चर्चा रंगली आहे. मतदारयादीतील या गंभीर चुकांचा आगामी पीसीएमसी निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00