विद्यार्थ्यांच्या सूर्यनमस्कारांनी चिंचवड उजळले; १२वा महोत्सव उत्साहात
चिंचवड प्रतिनिधी :पिंपरी–चिंचवड महानगरपालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार महोत्सवाचा बारावा वर्षाचा भव्य उपक्रम मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात शेकडो विद्यार्थी, नागरिक, महिला, युवक तसेच योग शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग (Suryanamaskar Mahotsav) नोंदवला.
या कार्यक्रमाला पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा आयुक्त पंकज पाटील, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण अधिकारी संगीता बांगर, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आयोजक रामकृष्ण पालमकर (अध्यक्ष – आशाकिरण सोशल फाउंडेशन), डॉ. अलका नाथ्रेकर, कुलकर्णी (भगवद्गीता मुख्य शिक्षिका – आशाकिरण सोशल फाउंडेशन), निर्मल गुप्ता (मुख्य योग शिक्षक), बाळासाहेब साठे (प्रसिद्धी प्रमुख), आर.जे. प्रशांत गाडेकर तसेच पतंजली योग समितीचे डॉ. अजित जगताप उपस्थित(Suryanamaskar Mahotsav) होते.
प्रास्ताविकात रामकृष्ण पालमकर यांनी सांगितले की, इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांचा या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग असून योग, आरोग्य, शिस्त व संस्कार यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश (Suryanamaskar Mahotsav)आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना क्रीडा आयुक्त पंकज पाटील म्हणाले, “रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, सकारात्मकता आणि ऊर्जेचा स्रोत आहे. भारतीय संस्कृतीनुसार सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरायण प्रवास सुरू करतो, अशी श्रद्धा असून त्यामुळे सूर्यनमस्काराला विशेष महत्त्व (Suryanamaskar Mahotsav)आहे.”
महोत्सवात विद्यार्थ्यांकडून भगवद्गीतेचे पठण करण्याtत आले. सहभागी विद्यार्थ्यांना टी-शर्ट, भगवद्गीता पुस्तक तसेच खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात (Suryanamaskar Mahotsav)आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. प्रशांत गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षण अधिकारी संगीता बांगर यांनी (Suryanamaskar Mahotsav)केले.
