प्रतिनिधी :महानगरपालिका हद्दीतील रावेत परिसरामध्ये मुख्य अशुद्ध पाण्याच्या (Raw Water) जलवाहिनीला गळती आढळून आली आहे. सदर गळती दुरुस्तीचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात आले असून, हे काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन (PCMC Water Supply) आहे.
या दुरुस्ती कामामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये आज सायंकाळचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तसेच काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उद्याच्या पाणीपुरवठ्यावरही होऊ शकतो व काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाऊ(PCMC Water Supply) शकतो.
तरी सर्व शहरवासीयांनी याची नोंद घ्यावी व उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्री. अजय सूर्यवंशी यांनी केले (PCMC Water Supply) आहे.
