Home माझं पिंपरी चिंचवड Savitribai Phule Jayanti:आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान | अंनिस पिंपरी-चिंचवड उपक्रम

Savitribai Phule Jayanti:आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान | अंनिस पिंपरी-चिंचवड उपक्रम

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अंनिस ग्रंथदिंडी व पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.

by Admin
Spread the love

चिंचवड :एक अनोखा आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अंनिस ग्रंथदिंडी व पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे साजरा करण्यात आला. पारंबी प्लॉट क्र. ३७२, सेक्टर २८, प्राधिकरण येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात  (Savitribai Phule Jayanti) आला.

या कार्यक्रमात प्रा. सुरेखा कटारिया, डॉ. श्वेता राठोड, अंजली देशमुख, डॉ. ज्योती शेट्टी तसेच दिपाली पेंडसे कुलकर्णी (अमेरिका) यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. पेंडसेकाका म्हणाले की, अंनिसने हुतात्मा डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन केले असून, त्याअंतर्गत अशा प्रकारच्या व्याख्यानमालेचे आयोजन यावर्षीपासून सुरू करण्याचा मनोदय आहे. अशा कार्यक्रमांमुळे अंनिस चळवळीला बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.सर्व आधुनिक सावित्रीबाईंचा सुंदर परिचय अलका जाधव यांनी करून (Savitribai Phule Jayanti )दिला.

प्रा. सुरेखा कटारिया आणि डॉ. श्वेता राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रभावी मांडणी संवादात्मक पद्धतीने केली. सावित्रीबाई – काल, आज आणि उद्या हा विषय द्विपात्री नाट्यछटेतील संवादातून अत्यंत सुरेलपणे सादर करण्यात आला. डॉ. श्वेता राठोड यांनी पोवाड्याच्या माध्यमातून कार्यक्रमात विशेष रंगत (Savitribai Phule Jayanti)आणली.

यानंतर दिपाली पेंडसे कुलकर्णी यांनी अमेरिकेत चालवत असलेल्या “गुरुकुल – माझी फुलपाखरे” या उपक्रमाविषयी माहिती दिली. या माध्यमातून अमेरिकेतील मराठी कुटुंबातील मुलांना मराठी भाषा कशी शिकवली जाते, याचे अनुभव त्यांनी मुलाखतीतून हसत-खेळत मांडले. अमेरिकेत मुलांना मराठी शिकण्याची गरज त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली, जे उपस्थितांसाठी आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी (Savitribai Phule Jayanti)ठरले.

अंजली देशमुख यांनी देहूरोड येथे गेली अनेक वर्षे चालवत असलेल्या अशा स्वरूपाच्या बालवाडीबाबत माहिती दिली. संसाराला हातभार लावत सामाजिक कार्य करणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. ज्योती शेट्टी यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित (Savitribai Phule Jayanti)केले.

 

सूत्रसंचालन इला पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या आकर्षक शैलीत केले, तर आभारप्रदर्शन मिलिंद देशमुख यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बावनकर, सरोज पेंडसे, प्रदीप तासगांवकर, मनीषा चक्रे, इंद्रजित तसेच सर्व कार्यकर्त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00