Home गुन्हे Pune City Police:लोणीकंद पोलीस ठाण्याची MPDA अंतर्गत मोठी कारवाई

Pune City Police:लोणीकंद पोलीस ठाण्याची MPDA अंतर्गत मोठी कारवाई

लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर अंतर्गत MPDA कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. हातभट्टीवाला गुन्हेगार ञानेश्वर उर्फ भुऱ्या गब्बर राजपूत यास एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. अवैध हातभट्टी व्यवसाय व धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची कठोर कारवाई.

by Admin
Spread the love

पुणे (प्रतिनिधी):लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम 1981) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली (Pune City Police) आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील हातभट्टीवाला रेकॉर्डवरील आरोपी ञानेश्वर उर्फ भुऱ्या गब्बर राजपूत (वय 23 वर्षे, रा. वाडेगाव, बुद्धविहाराजवळ, ता. हवेली, जि. पुणे) यास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार 01 वर्षाकरिता छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले (Pune City Police)आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांचे जा. क्र. पीसीबी/स्थानबद्ध/लोणीकंद/राजपूत/03/2026, दिनांक 02 जानेवारी 2026 अन्वये करण्यात आली असून सदर आरोपीस दि. 03 जानेवारी 2026 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करण्यात आली(Pune City Police) आहे.

सदर आरोपीकडून सातत्याने कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने तसेच त्याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने MPDA कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी (Pune City Police) सांगितले.

ही कारवाई मा. श्री अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. श्री रंजनकुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त), मा. श्री मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग), मा. श्री सोमय मुंडे (पोलीस उप-आयुक्त, परि-07), मा. निकिता पवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार (Pune City Police)पडली.

ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, तसेच सर्वेलन्स व पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार (Pune City Police) पाडली.

या कारवाईमुळे लोणीकंद परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठा आघात बसला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत (Pune City Police)आहे.

 

https://youtube.com/watch?v=R_kDm–wYkM&si=KLxJacrLpOwMhyUB


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00